अमरावती : मध्‍य रेल्‍वेच्‍या नागपूर विभागात नागपूर ते वर्धा दरम्‍यान सिंदी रेल्‍वे स्‍थानकावर तांत्रिक काम करण्यात येत आहे. त्यामुळे नागपूर ते अमरावती दरम्‍यान धावणाऱ्या ९ रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत. उद्या १८ डिसेंबरला सात रेल्‍वेगाड्या धावणार नाहीत. काही रेल्‍वेगाड्यांचे थांबे बदलविण्‍यात आले आहेत, तर काही रेल्‍वेगाड्या उशिरा धावणार आहेत.

१८ डिसेंबर रोजी वर्धा-नागपूर मेमू (०१३७३), नागपूर-वर्धा मेमू (०१३७४), अमरावती-वर्धा मेमू (०१३७१) / वर्धा-अमरावती मेमू (०१३७२), भुसावळ-वर्धा एक्स्प्रेस (१११२१)/ वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस (१११२२), अमरावती- अजनी एक्स्प्रेस (१२११९)/ अजनी अमरावती एक्स्प्रेस (१२१२०) तर अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस (१३१५९) या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

New road from private land to exit Virar station platform
विरार फलाटावरून बाहेर पडण्यासाठी खासगी जागेतून नवीन रस्ता; अडथळ्यातून प्रवाशांची सुटका
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Trials underway to launch Amrut Bharat Express from Pune on four routes in North India Pune print news
पुण्यातून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ उत्तर भारतातील चार मार्गांवर सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
cr start work of widening the pedestrian bridge at Diva railway station
दिवा रेल्वे पादचारी पुलावरील गर्दीचा ताण कमी होणार! ;मध्य रेल्वेकडून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी

हेही वाचा – Mahavikas Aghadi Protest March : ‘महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट’, विरोधकांनी विधानभवनात…

u

नागपूर-वर्धा मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्‍यात आल्‍या असून काही गाड्या परावर्तित मार्गाने जाणार आहेत. काही गाड्यांचे थांबे बदलविण्‍यात आले आहेत. लांब अंतराच्‍या अनेक गाड्या उशिरा धावणार आहेत. त्‍यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्‍याची शक्‍यता आहे.

महाराष्‍ट्र एक्‍स्‍प्रेस वर्धा स्‍थानकावरून

गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर गोंदिया महाराष्‍ट्र एक्‍स्‍प्रेस १७ डिसेंबर रोजी वर्धा रेल्वे स्थानकावर थांबेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ११०४० गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस १८ डिसेंबरला गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटण्याऐवजी वर्धा रेल्वे स्थानकावरून दुपारी ११:५९ वाजता सुटेल.

हेही वाचा – बीड जिल्ह्यातील सरपंचाची हत्या, विधानसभेत काय घडले?

उशिरा धावणाऱ्या गाड्या

गाडी क्रमांक ०५२९३ मुजफ्फरपूर सिकंदराबाद एक्स्प्रेस १७ डिसेंबरला आपल्या निर्धारित वेळेत सुटण्याऐवजी १ तास ३५ मिनिटे उशिरा धावेल. १२६२१ चेन्नई नवी दिल्ली एक्स्प्रेस याच दिवशी १.३० तास उशिरा, तर २०८०५ विशाखापट्टनम नवी दिल्ली एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेपेक्षा १.१५ तास विलंबाने धावेल. १२६२२ नवी दिल्ली चेन्नई एक्स्प्रेस १७ डिसेंबरला १.१० तास विलंबाने, तर १२६९१ बंगळुरू हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ४५ मिनिटे उशिरा धावेल. १२८१० हावडा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा ३० मिनिटे, १२७२३ हैदराबाद न्यू दिल्ली एक्स्प्रेस ३० मिनिटे, १८०३० कोलकाता शालीमार एलटीटी एक्स्प्रेस १५ मिनिटे, २२९०६ कोलकाता शालीमार ओखा एक्स्प्रेस १० मिनिटे, १२९७० जयपूर कोईम्बतूर एक्स्प्रेस १० मिनिटे, १२८४३ पूरी अहमदाबाद एक्स्प्रेस १० मिनिटे, २२६७० पाटना एर्नाकुलम एक्स्प्रेस १० मिनिटे, १२५१२ कोचुवेली गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी १० मिनिटे, तर ०११३९ नागपूर मडगाव एक्स्प्रेस (१८ डिसेंबरला) १० मिनिटे उशिरा धावेल.

Story img Loader