अमरावती : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर ते वर्धा दरम्यान सिंदी रेल्वे स्थानकावर तांत्रिक काम करण्यात येत आहे. त्यामुळे नागपूर ते अमरावती दरम्यान धावणाऱ्या ९ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. उद्या १८ डिसेंबरला सात रेल्वेगाड्या धावणार नाहीत. काही रेल्वेगाड्यांचे थांबे बदलविण्यात आले आहेत, तर काही रेल्वेगाड्या उशिरा धावणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१८ डिसेंबर रोजी वर्धा-नागपूर मेमू (०१३७३), नागपूर-वर्धा मेमू (०१३७४), अमरावती-वर्धा मेमू (०१३७१) / वर्धा-अमरावती मेमू (०१३७२), भुसावळ-वर्धा एक्स्प्रेस (१११२१)/ वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस (१११२२), अमरावती- अजनी एक्स्प्रेस (१२११९)/ अजनी अमरावती एक्स्प्रेस (१२१२०) तर अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस (१३१५९) या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.
u
नागपूर-वर्धा मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या परावर्तित मार्गाने जाणार आहेत. काही गाड्यांचे थांबे बदलविण्यात आले आहेत. लांब अंतराच्या अनेक गाड्या उशिरा धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेस वर्धा स्थानकावरून
गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस १७ डिसेंबर रोजी वर्धा रेल्वे स्थानकावर थांबेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ११०४० गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस १८ डिसेंबरला गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटण्याऐवजी वर्धा रेल्वे स्थानकावरून दुपारी ११:५९ वाजता सुटेल.
हेही वाचा – बीड जिल्ह्यातील सरपंचाची हत्या, विधानसभेत काय घडले?
उशिरा धावणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक ०५२९३ मुजफ्फरपूर सिकंदराबाद एक्स्प्रेस १७ डिसेंबरला आपल्या निर्धारित वेळेत सुटण्याऐवजी १ तास ३५ मिनिटे उशिरा धावेल. १२६२१ चेन्नई नवी दिल्ली एक्स्प्रेस याच दिवशी १.३० तास उशिरा, तर २०८०५ विशाखापट्टनम नवी दिल्ली एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेपेक्षा १.१५ तास विलंबाने धावेल. १२६२२ नवी दिल्ली चेन्नई एक्स्प्रेस १७ डिसेंबरला १.१० तास विलंबाने, तर १२६९१ बंगळुरू हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ४५ मिनिटे उशिरा धावेल. १२८१० हावडा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा ३० मिनिटे, १२७२३ हैदराबाद न्यू दिल्ली एक्स्प्रेस ३० मिनिटे, १८०३० कोलकाता शालीमार एलटीटी एक्स्प्रेस १५ मिनिटे, २२९०६ कोलकाता शालीमार ओखा एक्स्प्रेस १० मिनिटे, १२९७० जयपूर कोईम्बतूर एक्स्प्रेस १० मिनिटे, १२८४३ पूरी अहमदाबाद एक्स्प्रेस १० मिनिटे, २२६७० पाटना एर्नाकुलम एक्स्प्रेस १० मिनिटे, १२५१२ कोचुवेली गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी १० मिनिटे, तर ०११३९ नागपूर मडगाव एक्स्प्रेस (१८ डिसेंबरला) १० मिनिटे उशिरा धावेल.