महिलांसाठीचे अभ्यासक्रम असा शिक्का मारलेल्या फॅशन, इंटेरिअर, सौंदर्य प्रसाधने तंत्रज्ञान आणि वस्त्रविज्ञान शास्त्र क्षेत्रातील विद्याशाखांतील मुलींना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. त्यांना मिळणारे पॅकेजही सन्मानजनक असून सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती, परीक्षण आणि व्यवस्थापनाचा अंतर्भाव करून मुलींना रोजगारक्षम बनवण्यात खामलास्थित निकालस महिला महाविद्यालयाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
महाविद्यालयात अभ्यासक्रमांमध्ये रसायनशास्त्र, शरीरशास्त्र, सौंदर्य संस्कृतीचाही अभ्यास असतो. शिवाय पुस्तकी अभ्यासाबरोबरच प्रात्यक्षिकाची जोड असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये मुली नोकरी, व्यवसायाबरोबरच स्वयंरोजगाराकडेही वळतात. नोकरीला लागणाऱ्या मुलींना १२ ते २० हजार रुपये महिना सहज मिळतो आणि त्यासाठी कौशल्य पणाला लावण्याची संधी मिळते.
व्यावसायिक जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी कॉस्मेटिक तंत्रज्ञान, अंतर्गत सजावट, फॅशन डिझाईनिंग, वस्त्रोद्योग विज्ञानाचे अभ्यासक्रम व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणारे आहेत. यात प्रात्यक्षिके आणि औद्योगिक प्रशिक्षण याद्वारे विद्यार्थिनींना व्यावसायिक जगाची आव्हाने पेलण्यास सक्षम बनवले जाते. पूर्वी केवळ शहरांमध्ये व्यवसायाच्या संधी मिळत असत. आता पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करून लहान गावातही मुली स्वयंरोजगाराचे धडे गिरवताना दिसतात, ते या अभ्यासक्रमांमुळेच शक्य झाले. फॅशन किंवा घराची अंतर्गत सजावट हे हल्लीच्या जगण्यातील महत्त्वाचा घटक समजला जातो. घरातील खिडक्यांच्या पडद्यांपासून रंगांची निवड करण्यापर्यंतचे अंतर्गत सजावटीत येतात.
वस्त्रविज्ञान, अंतर्गत सजावट, सौंदर्य प्रसाधने तंत्रज्ञान इत्यादी विषयांमध्ये निकालस महिला महाविद्यालयातून पदवी शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्याही मोठी आहे. बैद्यनाथ, प्रॉक्टर अॅंड गॅम्बल, हिंदूुस्तान युनिलिव्हर, लोटस, ब्युटिक, इमामी, ओरिफ्लेम, फेम केअर, अॅव्हॉन, श्रींगार इत्यादी कंपनीत मुलींना संधी मिळतात. अंतर्गत सजावटीत पदवीप्राप्त विद्यार्थिनी आर्किटेक्टकडे सहायक म्हणून अथवा डिझाईनर म्हणून स्वत:ची वेगळी छाप सोडतात. गोदरेज, स्पेसवूड, बिग बाजारमध्ये चांगल्या पदांवर मुलींना संधी मिळते. वस्त्रोद्योगात वस्त्राची रंगाई, छपाई, गुणवत्ता नियंत्रण, संगणकाद्वारे डिझाईनमध्ये डिझाइनर, स्टाईलिस्ट, रचनाकार, र्मचडायझर, सल्लागार व्यवस्थापक आणि सरकारी क्षेत्रातही महत्त्वाच्या पदांवर महाविद्यालयाच्या विद्यार्थी आहेत.
फॅशन, इंटेरिअर, सौंदर्य प्रसाधने तंत्रज्ञान अभ्यासक्रमांनी महिला रोजगारक्षम
मुलींना रोजगारक्षम बनवण्यात खामलास्थित निकालस महिला महाविद्यालयाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-02-2016 at 02:56 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technology lessons by hema malini on fashion interior cosmetics