नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने पश्चिम घाटातील निसर्गात वास्तव्य करणाऱ्या सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. तेजस उद्धव ठाकरे आणि हर्षिल पटेल यांच्या नेतृत्वातील चमूने पश्चिम घाटात सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. ‘सह्याद्रीओफिस उत्तराघाटी’ असे नाव या नव्या प्रजातीला देण्यात आले आहे. तेजस ठाकरे आणि हर्षिल पटेल यांच्यासह कॅम्पबेल, झीशान मिर्झा यांचाही टीममध्ये समावेश होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – भंडारा : यमदूत दारातच उभा! महावितरणचा दुर्लक्षितपणा लोकांच्या जिवावर उठला; ७ वर्षांपासून रोहित्र हटविण्याची मागणी

हेही वाचा – वाशीम : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा वाद पेटला, आंदोलनकर्त्यांनी नांदेड अकोला महामार्ग रोखला

पश्चिम घाटासाठी वापरला जाणारा ‘सह्याद्री’ हा संस्कृत शब्द आणि ‘ओफिस’ म्हणजे सापासाठी वापरला जाणारा ग्रीक शब्द विलीन करून हे नाव देण्यात आले आहे. या प्रजातीला ‘उत्तराघाटी’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यात ‘उत्तरा’ म्हणजे ‘उत्तर दिशा दर्शविणारी’ आणि ‘घाटी’ हा पर्वत/घाटातील रहिवास अशा संदर्भातून आलेला शब्द आहे. हे नामकरण प्रजातींचे घाटातील उत्तरेकडे असलेला निवास दर्शवते. हा अभ्यास आपल्याला घाटांच्या जैवविविधतेबद्दल समजून घेण्यास हातभार लावतो. हे क्षेत्र मानवजातीसाठी अद्याप रहस्यमय असल्याचे ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनने म्हटले आहे. याआधीही तेजस ठाकरे यांनी खेकडे, मासे, पाली अशा विविध दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावून त्यांना नवी ओळख मिळवून दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejas thackeray and his team have discovered a new species of snake living in nature in the western ghats rgc 76 ssb