अकोला : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोकसंचालित साधन केंद्र व बचत गटांतील महिलांच्या योगदानातून अकोल्यात तेजस्विनी भवन उभारण्यात आले आहे.साधन केंद्रातर्फे उभारलेली ही महाराष्ट्रातील पहिली इमारत ठरली. अकोल्यात हा पथदर्शी उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या चळवळीला बळ मिळणार आहे.

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली की कुटुंबाचा व समाजाचाही विकास होतो. त्यादृष्टीने विविध व्यवसाय, उपक्रमांची जोड देणे आवश्यक असते. शेतीपूरक व्यवसायांबरोबरच इतर व्यवसायांचाही विचार होणे गरजेचे आहे. महिलांना सक्षम करण्याचे कार्य बचत गटाच्या माध्यमातून होत असते. लोकसंचालित साधन केंद्र व बचत गटातील महिलांनी शहरातील डाबकी रस्त्यावरील उगलेवाडीत ‘तेजस्विनी भवन’ साकारले आहे. या वास्तूचे उद्घाटन नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. बचत गटांच्या माध्यमांतून ग्रामीण व शहरी भागात विविध व्यवसाय करणाऱ्या महिलांचे एकत्रीकरण झाले. महिलांच्या कष्ट व योगदानातून शहरात ‘तेजस्विनी भवन’ची वास्तू उभी राहिली आहे. तेजस्विनी भवनाची दोन मजली इमारत असून, त्यात कार्यालय, प्रशिक्षण सभागृह, वाहनतळ, स्वच्छतागृह आदी सुविधा आहेत. ही वास्तू तीन हजार १०० फुटांच्या क्षेत्रात सुमारे ६५ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आली आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
mauled dog in Chikhli bitten many causing fear among residents
चिखलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ३० जणांना चावा
Allu Arjun Arrested in Hyderabad Stampede Case
Allu Arjun Arrest Video: ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला राहत्या घरातून अटक; ‘त्या’ घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई!
Bombay High Court
‘…तर लोकांना कायदा हातात घेऊ द्या’, मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला सुनावलं; कारण काय?
A truck carrying 35 tonnes of betel nuts from Assam to Mumbai went missing
गोंदिया : आसाम वरून मुंबईला जाणारे सुपारीचे ट्रक बेपत्ता
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
The Eagle Is Flying With The Lion Animal shocking Video Goes Viral on social media
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरूडानं केली सिंहाची शिकार; १ हजार फूट उंचावर नेलं अन्..शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

हेही वाचा…चिखलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ३० जणांना चावा

तालुका लोकसंचालित साधन केंद्रातर्फे एक हजार ६०० बचत गट व सुमारे १७ हजार ५०० महिला संघटक कार्यरत आहेत. या सर्व महिलांना उद्योग- व्यवसाय उभारणीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे अकोला तालुक्यात गावोगाव अनेक छोटे व्यवसाय सुरू झाले आहेत. आता तेजस्विनी भवन निर्माण झाल्यामुळे गटांना उत्तम प्रशिक्षणासाठी सभागृहाची सुविधा उपलब्ध झाली, असे लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सोनाली अंबरते यांनी सांगितले.

हेही वाचा…“वरिष्ठांचा निर्णय अंतिम, पण पालकमंत्री जिल्ह्यातीलच हवा”, महायुतीच्या नेत्यांची भावना

सुवर्ण महोत्सवी वर्षात स्वबळावर इमारत

‘माविम’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षात केंद्राची स्वबळावर इमारत उभी झाली. हे महिलांच्या स्वयंपूर्णतेचे आदर्श उदाहरण ठरत आहे. जिल्ह्यात तूर डाळ, सोयाबीन, कपाशी ही प्रमुख पिके आहेत. त्यातून बचत गटाच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया व्यवसायांचे जाळे निर्माण होऊ शकते. लोकसंचालित साधन केंद्र व बचत गटांतील महिलांच्या योगदानातून अकोल्यात तेजस्विनी भवन उभारले. या प्रकारची महाराष्ट्रातील पहिली इमारत आहे. बचत गटाच्या चळवळीतील हा महत्त्वाचा टप्पा ठरला. वर्षा खोब्रागडे, जिल्हा समन्वय अधिकारी, ‘माविम’

Story img Loader