नागपूर: नागपूरमध्ये काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून त्यात मोठ्या संख्येने देशभरातून कार्यकर्ते, नेते सहभागी झाले आहेत. नुकत्याच चार राज्याच्या निवडणुका झाल्या. त्यात नागपूरला लागून असलेल्या तेलंगणामध्ये काँग्रेसने दणदणीत विजय प्राप्त केला. या राज्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सुद्धा या सभेत सहभागी झाले. रेड्डी कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या छोटश्या भाषणात रेड्डी यांनी उपस्थित तरुण कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले “ देशभरातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांसाठी  पुढचे १०० दिवस अत्यंत महत्वाचे व किंमती आहे. प्रत्येकाने हे दिवस पक्षासाठी द्यावे, रांत्र आणि दिवस काम करून पक्षाला विजय मिळवून द्यावा, राहुल गांधीचे हात बळकट करावे”रेड्डी यांनी त्यांच्या भाषणात भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले भाजपचे डबल इंजिन म्हणजे अंदानी आणि अंबाणी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana chief minister revanth reddy appealed to the youth workaers present to be ready for the upcoming lok sabha elections cwb 76 amy