बुलढाणा: उन्हाळा की पावसाळा असा मजेदार संभ्रम निर्माण करणाऱ्या उन्हाळ्यात बुलढाण्याच्या तापमानात लक्षणीय घट झाल्याचे मजेदार चित्र आहे.
मागील सातेक दिवसांपासून बुलढाणा शहरात नियमितपणे पाऊस हजेरी लावत आहे. दिवसा चार वाजताच्या सुमारास सुरू होणारा पाऊस कधी मुसळधार, कधी मध्यम तर कधी रिमझिम स्वरूपाचा राहतो. रात्रीही पाऊस उसंत घेत नाही. यामुळे बुलढाण्याच्या तापमानात घट झाली आहे.
हेही वाचा >>> Video : चंद्रपुरात मुसळधार पाऊस व गारपीट; आझाद बागेसमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी
मागील सहा दिवसात कमाल तापमान २६ ते २८ डिग्रीच्या रेंगाळत आहे. एप्रिल मध्ये बुलढाण्याचे कमाल तापमान ३९ ते ४१ डिग्री दरम्यान राहते. आज १ मे रोजी संध्याकाळी मोजण्यात आलेले कमाल तापमान ३१ डिग्री इतके होते. किमान तापमानाचा पारा चक्क १९ डिग्री पर्यंत घसरल्याने पहाटे शहर गारठले! त्यामुळे नागरिकांना मे महिन्यात ब्लॅंकेटचा वापर करावा लागला.
पावसाळी वस्तू ‘बाहेर’ ; उन्हाळी बंदीस्तच!
दरम्यान या विचित्र वातावरणामुळे ब्लॅंकेट, जाकीट, स्वेटर या हिवाळ्यात लागणारे साहित्य बाहेर काढण्याची पाळी शहरवासीयांवर आली आहे. नियमितपणे कोसळनाऱ्या पावसामुळे उन्हाळ्यात छत्र्याचा वापर करणे भाग पडत आहे. मात्र आज पावसाने सुट्टी घेतली होती.