चंद्रपूर: गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूर व ब्रम्हपुरी शहराने तापमानाचा उच्चांक गाठला आहे. पारा ४५.८ अंशावर पोहोचला आहे. बुधवारी पुन्हा एकदा चंद्रपुरात ४५.५ तर ब्रम्हपुरीत ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शाळा वेळापत्रक बदल केला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवा व त्यानंतर सुटी द्या असे निर्देश दिले आहेत.

शहरात उष्णतेची लाट असतानाही केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या नादात कॅान्व्हेंट, खासगी शाळा दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू आहेत. काही काँन्व्हेंटमध्ये अतिरिक्त वर्गाच्या नावावर विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत बसवून ठेवण्यात येते. यामुळे विद्यार्थी उष्माघाताचे बळी पडू शकतात. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार व इतर लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटनांनी शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत आता प्रशासनाने प्रमुख जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढून शाळा, महाविद्यालयांच्या वेळेत आता बदल केला आहे.

आता सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच शाळा, महाविद्यालये सुरू राहणार आहे. या वेळांचे पालन न केल्यास त्या शाळांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

भारतातील सर्वाधिक उष्ण शहराच्या यादीत चंद्रपूर शहराचा समावेश आहे.फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपासून तापमान वाढण्यास सुरवात होते. मार्च, एप्रिल आणि मे महिना हा असहाय्य ठरतो. एप्रिल महिना लागताच तापमानाने उचांक गाठणे सुरू केले आहे. असे असतानाही शाळा, कॅान्व्हेंट सकाळी सात ते बारा वाजतापर्यंत सुरू आहे. काही कॅान्व्हेंटमध्ये अतिरिक्त वर्गही सुरू आहेत. तापमान वाढत असतानाही केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या हट्टाने विद्यार्थ्यांना शाळेत बसवून ठेवण्यात येत आहे.

वाढत्या तापमानाचा विचार करून शालेय विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी माजी पालकमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शाळेच्या वेळा बदलण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती केली होती. या पत्राची तत्काळ दखल घेत, अवघ्या काही तासांतच शाळेच्या वेळांबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. तसे परिपत्रक निघाले आहे. त्यानुसार आता शाळा, महाविद्यालये सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू राहतील.

सोमवारी सर्व शाळा, कॅान्व्हेंटच्या मुख्याध्यापकांची व्हिसी घेण्यात आली.bयावेळी पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी सहभागी झाले होते. सगळ्यांना नव्या परिपत्रकानुसार सात ते अकरा वाजतापर्यंत शाळा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे. अकरा वाजतानंतर ज्या शाळा, कॅान्व्हेंट सुरू राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

सोमवारी सर्व शाळा, कॅान्व्हेंटच्या मुख्याध्यापकांची व्हिसी घेण्यात आली.bयावेळी पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी सहभागी झाले होते. सगळ्यांना नव्या परिपत्रकानुसार सात ते अकरा वाजतापर्यंत शाळा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे. अकरा वाजतानंतर ज्या शाळा, कॅान्व्हेंट सुरू राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. – अश्विनी सोनवणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, चंद्रपूर.