लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. आता पुन्हा एकदा २४ ते २७ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

२५ एप्रिलला काही जिल्ह्यांत विजांचा गडगडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात होते. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत तापमानाचे उच्चांक नोंदवले जातात. तापमानाने या महिन्यात चाळीशी पार केली आणि हा पारा आणखी चढेल असे वाटत असतानाच पुन्हा अवकाळी पावसाने थैमान घातले. यात शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेच, पण सर्वसामान्य नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांची घरे पडली, झाडे पडून वाहनांचे नुकसान झाले, वीज पडून जनावरे दगावली.

हेही वाचा… चंद्रपूर: वाघाची रस्त्यावर डौलदार चाल; दोन्ही बाजूची वाहतूक थांबली, ताडोबात पर्यटकांनी घेतले मनसोक्त दर्शन

गुरुवारी मुसळधार पावसाने उपराजधानीसह संपूर्ण विदर्भाला झोडपून काढल्यानंतर २४ तासांची उसंत देत शनिवारी पुन्हा गारपिटीसह दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रविवारी २४ तासांत थोडी उसंत मिळाली असताना आता पुन्हा एकदा चार दिवस वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. त्यामुळे विदर्भात उन्हाळा आहे की पावसाळा याचाच अंदाज येईनासा झाला आहे.

हेही वाचा… कॉंग्रेसमधून निलंबित माजी आमदार बावनकुळेंच्या भेटीला, तर्कवितर्क सुरू

पावसामुळे तापमानातही सातत्याने घट होत आहे आणि वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. १९ एप्रिल या एकाच दिवशी उपराजधानीचा पारा ४२ अंशावर गेला होता, तर चंद्रपूर, गोंदिया शहरातही तापमान ४२, ४३ अंश सेल्सिअसवर होते. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमान पुन्हा चाळीशीच्या आत असून ३५ अंश सेल्सिअसपर्यंत ते खाली घसरले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperatures have crossed the 40s this month as well as unseasonal rains in nagpur again rgc 76 dvr
Show comments