नागपूर येथे होणा-या हिवाळी अधिवेशनासाठी लिपिक टंकलेखक आणि शिपाई  व संदेशवाहकांची तात्पुरत्या पूर्णतः हंगामी स्वरूपात पदे भरण्यात येणार आहेत. लिपीक-टंकलेखकांची एकूण १० पदे आणि शिपाई व संदेश वाहकांची एकूण २४ पदे भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर : ‘स्वस्त वीज उपलब्ध झाली तरच उद्योग विदर्भात’

लिपीक-टंकलेखक या पदाकरिता शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखक ४० श.प्र.मि. व संगणकाची एमएससीआयटी किंवा इतर समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण, वयाची अट खुला संवर्गासाठी १८ ते ३८ वर्षे, मागास वर्गासाठी वय १८ ते ४३ वर्षे (५ वर्ष नियमाप्रमाणे शिथीलक्षम) शिपाई, संदेश वाहकासाठी शैक्षणिक अर्हता चौथा वर्ग उत्तीर्ण किंवा उच्च अर्हता, वयाची अट खुल्या संवर्गासाठी वय १८ ते ३८ वर्षे, मागास वर्गासाठी १८ ते ४३ वर्षे ( ५ वर्षे नियमाप्रमाणे शिथीलक्षम)  तसेच सायकल चालविता येणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक ४ ते २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्ज सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्र.२, २ रा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४००० येथे स्वीकारण्यात येतील.   इच्छुक उमेदवारांनी कार्यालयात अर्जाचा नमुना घेण्यासाठी येताना सोबत फोटो तसेच इतर शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. अर्जाचा विहित नमुना  कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असल्याचे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार य उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी कळविले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temporary recruitment for clerks typists and peon in nagpur winter session zws