नागपूर : करोना काळात राज्यभऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत करोनाग्रस्तांवर उपचारासाठी विविध प्रशासकीय सेवा सांभाळणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांना स्थायी करण्याचे आश्वासन दिल्यावरही काहीच झाले नाही. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवडीसाठी राबवलेल्या प्रक्रियेत ३१ जणांची यादी प्रसिद्ध केली गेली. त्यात मुलाखत देणाऱ्यांतील १९ जणांची अस्थायी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय शिक्षण खात्यातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या ३३ पदांसाठी निवड प्रक्रिया राबवली. त्यात सुमारे ९९ उमेदवारांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सर्वाधिक गुण मिळवलेल्या ३१ जणांची यादी आयोगाने प्रसिद्ध केली आहे. त्यात तब्बल १९ उमेदवार हे गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण खात्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत आधीपासूनच अस्थायी स्वरूपात सेवा देत आहेत. त्यामुळे या सगळ्यांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने यांना दिलासा मिळाला आहे. परंतु इतर अस्थायी द्यकीय शिक्षकांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
हेही वाचा: बुलढाणा: उद्धव ठाकरेंच्या चिखलीतील सभेला पोलिसांची सशर्त परवानगी
या सगळ्यांनाच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी स्थायी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पुढे काहीही झाले नाही. दरम्यान, राज्यात सत्तापरिवर्तन झाले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तरी न्याय देणार काय, याकडे सगळ्या अस्थायी शिक्षकांचे लक्ष लागले आहे.