बुलढाणा : शीर्षक वाचून कुणीही बुचकळ्यात पडणे स्वाभाविक आहे. मुंडन म्हणजे जवळच्या सगे सोयऱ्याच्या निधना नंतर करतात. अलीकडे राजकीय आंदोलनात सरकार किंवा प्रशासनाच्या विरोधात, जहाल निषेध व्यक्त करण्यासाठी मुंडण आंदोलन करण्यात येते…मात्र या घटनेतील मुंडन मात्र आगळे वेगळे असून ते खरोखरच मनोबल वाढविण्यासाठी किंवा सहानुभूती दर्शविण्यासाठीचे मुंडन आहे. शेगाव म्हटले कि संतनगरी, गजानन महाराजांची पुण्यभूमी नजरेसमोर येते. मात्र आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मात्र दुर्दैवाने शेगाव म्हटल्यावर केस गळती आणि टक्कल पडण्याचा आजार, त्याने पीडित गावकरी असे चित्र देखील समोर येते. शेगाव तालुक्यातील बारा गावे आणि दोनएकशे गावकरी या आजाराने पीडित आहे. हे रुग्ण हवालदिल झाले.
गावातील रुग्णांच्या प्रति सहानुभूती दर्शविण्यासाठी साठी बोन्डगाव या गावातील दहा नागरिकांनी टक्कल केले आहे.शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावात केस गळतीचे एकूण तीस रुग्ण असून त्यांच्यावर आरोग्य विभागाचे विविध शाखांकडून औषधोपचार सुरू आहेत. दरम्यान मनोबल कमी झालेल्या या रुग्णालयाचे मनोबल उंचावण्यासाठी येथील गावकऱ्यांनी स्वतःचे मुंडन केले आहे. या विचित्र आम्ही तुमच्या सोबत असल्याचे या गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
बोंडगाव या गावातील युवकांनी आपल्या गावात रुग्ण असलेल्या नागरिकांचे मुंडण झाले म्हणून स्वतःचे ही मुंडन करून घेतले आहे. शेगाव तालुक्यातील बारा गावांमध्ये मागील महिन्याभरापासून केस गळतीच्या घटना उघडकीस आलेले आहेत. आरोग्य प्रशासनाकडून ठोस निदान झाले नसल्याने उच्चस्तरीय आरोग्य प्रशासनाचे चमु बोलावून या प्रकाराची कसून चौकशी केल्या जात आहे मात्र अद्याप पर्यंत आरोग्य प्रशासनाला यामध्ये यश आलेले नाही. दुसरीकडे केस गळती प्रकरणातील आयसीएमआरचे रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे त्याची आतुरता गावकऱ्यांचा आरोग्य प्रशासनाला लागून आहे.