नागपूर: भूमी अभिलेख विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या ४६४४ पदांसाठी सोमवारपर्यंत दहा लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जुलै असून अर्जाची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक आल्याने उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तर तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात ३६ जिल्हे असून महसूल विभागानुसार कामकाज सुरू असते. याच महसूल विभागाअंतर्गत अगदी गावपातळीवर तलाठ्यांमार्फत सर्व कारभार सुरू असतो. मात्र, राज्यात सुमारे चार हजारहून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे महसूलासंदर्भात गाव पातळीवर विविध प्रकारचे कामकाज करणे अवघड होऊ लागले आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यात रिक्त असलेली तलाठ्यांची पदे भरण्याची निर्णय घेतला आहे.

हेही वाचा… वर्धा: मुलगी देण्यास नकार, भाच्याने केला मामावर वार!

४६४४ जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत दहा लाखांवर अर्ज आल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली. तसेच अर्जदारांची सख्या वाढल्यामुळे उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे आता १८ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

हेही वाचा… तब्‍बल सहा हजार गणेशमूर्ती एकाच ठिकाणी… कुठे माहितेय?

मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांची वयोमर्यादा मोजण्यासाठी १७ जुलै २०२३ हा दिनांक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten lakh applications have been received for 4644 posts of talathi recruitment dag 87 dvr
Show comments