उपराजधानीतील विविध बालरोग तज्ज्ञांकडे उपचाराला जाणाऱ्या १० ते १९ वर्षीय किशोरवयीन मुलांपैकी दहा टक्के मुलांमध्ये नैराश्य दिसून येते. तर खानपानातील वाईट सवयींसह इतर कारणांमुळे बऱ्याच मुलींमध्ये पूर्वीच्या तुलनेत दोन वर्षांपूर्वीच मासिक पाळी येत असल्याचेही धक्कादायक निरीक्षण ‘एडोलसेंट हेल्थ’ अकादमीने नोंदवले आहे.दहा ते १९ वयोगटातील मुलांमध्ये शारीरिक वाढीसह मानसिक, बौद्धिकसह इतरही विकास एकाच वेळी सुरू असतात. आता शिक्षणामध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांमध्ये नैराश्य, ताण-तणाव, आत्महत्येचे विचार येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बालरोग तज्ज्ञांकडे उपचाराला येणाऱ्या एकूण १०० रुग्णांपैकी सुमारे १० मुलांमध्ये नैराश्य दिसून येते. तर काही मुलांमध्ये आत्महत्या करण्याची वृत्तीही दिसून येते. त्यामुळे या मुलांकडे पालकांसह नातेवाईकांनीही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा >>>कोट्यवधींचे व्यवहार ठप्प! महाबँक कर्मचाऱ्यांचा संप, अकोल्यात नोकर भरतीसाठी कर्मचाऱ्यांद्वारे दुचाकी फेरी

home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO
Child Marriage, Supreme Court, Child Marriage Prevention Act,
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

मुलांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्यात आजारांचे प्रमाण कमी होत जाते. परंतु, स्पर्धेमुळे ताण-तणाव व नैराश्य वाढत आहे. त्यामुळे मुलांमध्ये आत्महत्येची वृत्ती बळावली आहे. या मुलांना आपलेसे करून संवाद साधल्यावर ही मुले सातत्याने विविध खेळ मोबाईलवर खेळत असल्याचेही या वाईट वृत्तीमागचे एक कारण असल्याचे बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणात पुढे आले. काही मुलांमध्ये अचानक संतापणे, उत्तेजित होणे, अभ्यासात रस कमी होण्याचेही प्रमाण वाढत असल्याची माहिती संघटनेच्या माजी अध्यक्षा डॉ. मंजूषा गिरी यांनी दिली. कोषाध्यक्ष डॉ. मीना देशमुख म्हणाल्या, पूर्वी मुलींमध्ये ९ ते १५ वर्षे वयोगटात मासिक पाळी सुरू होत होती. परंतु पिझ्झा, बर्गर, जंक फुडसह इतर खानपानाच्या वाईट सवयींमुळे लठ्ठपणासह इतरही समस्या वाढल्या आहेत. बऱ्याच मुलींची मासिक पाळी केवळ ७ ते ८ वर्षांतही सुरू होत आहे. त्याला मुलींच्या शरीराला गरजेनुसार आवश्यक विविध घटक जेवणातून न मिळणे हे एक कारण आहे.डॉ. लिनेश यावलकर म्हणाले, संघटनेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ १२ फेब्रुवारीला आयएमएच्या डॉ. दिनकर हरदास सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. प्रवीण डहाके तर सचिव म्हणून डॉ. दिनेश सरोज पदभार स्वीकारतील. तर इतरही पदाधिकारी विविध पदांची जबाबदारी स्वीकारतील.

हेही वाचा >>>‘सामना’तील अग्रलेखावर काँग्रेसचे प्रत्युत्तर, मित्र पक्षाच्या निर्णयावर मत व्यक्त करणे अयोग्य

मुलांचा ‘स्क्रिन टाईम’ वाढला

नवनियुक्त अध्यक्ष डॉ. प्रवीण डहाके म्हणाले, हल्ली लहान मुलांमध्ये भ्रमणध्वनी, दूरदर्शन, ‘लॅपटाॅप’वरील ‘स्क्रिन टाईम’ वाढला आहे. त्यातूनही मुलांमध्ये नवनवीन समस्या दिसत आहे. डॉ. दिनेश सरोज म्हणाले, हल्ली रस्ते अपघातात इजा होऊन मेंदूशी संबंधित आजाराचे मुलेही वाढत आहे.

लहान मुलांमध्ये ‘पोर्नोग्राफी’ बघण्याचे प्रमाण वाढले

करोना काळात ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या नावावर मुलांच्या हातात भ्रमणध्वनी आले. त्यामुळे लहान मुलांमध्येही ‘पोर्नोग्राफी’ बघण्याचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणात कमी वयाची मुले ‘पोर्नोग्राफी’ बघत असल्याचेही आढळले. पालकांनी या मुलांकडे विशेष लक्ष देऊन प्रेमाने समजावून सांगत हे व्यसन सोडवणे गरजेचे आहे, अशी माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.