चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागीतही मुली-महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एक जण दहावीचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १० वर्षीय मुलीचे आईवडील शेतमजूर आहेत. तिला मोठी बहीण असून पीडिता चौथीत शिकते. २२ नोव्हेंबरला आरोपी रोशन वाढीवे आणि बंटी (काल्पनिक नाव) या दोघांनी त्या मुलीला १० रुपये दिले आणि झाडाझुडूपात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर दर रविवारी शाळेला सुटी असल्यामुळे दोघेही तिला १० रुपये देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होते. गेल्या महिन्याभरापासून मुलीचे लैंगिक शोषण सुरू होते.
हेही वाचा: पळून जाऊन लग्न केले, पत्नीचे पुन्हा एका युवकावर प्रेम जडले; पतीला कुणकुण लागताच…
पीडित मुलीने आपल्या मैत्रिणीला पोट दुखत असल्याचे सांगितले. पोट दुखण्याचे कारण विचारले असता रोशन आणि बंटीने गैरकृत्य केल्याचे सांगितले. त्या मुलीने आपल्या आईला ही बाब सांगितली. शेजारी राहणाऱ्या मुलीशी एवढी गंभीर घटना घडत असल्यामुळे काळजीत पडलेल्या महिलेने शेजारणीला सांगितले. त्यामुळे मुलीच्या आईने तिची आस्थेने विचारपूस केली. तेव्हा आरोपी रोशन वाढीवे आणि बंटी यांची नावे सांगितले. त्यानंतर ती महिला मुलीला घेऊन पारशिवनी पोलीस ठाण्यात पोहचली. घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली.
हेही वाचा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उद्या बौद्धिक; शिंदे गटाचे आमदार काय करणार?
पोलीस उपनिरीक्षक सीमा बोंदरे यांनी गुन्हे दाखल करून रोशनला अटक केली. त्याला न्यायालयाने ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर अन्य आरोपी बंटी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. या घटनेमुळे पारशिवनीत मोठी खळ