राम भाकरे
तरुणांची संख्या ६३ हजारांवर
नागपूर : मार्च २०२० ते एप्रिल २०२१ या एक वर्षांच्या काळात नागपुरात एकू ण २ लाख ९६ हजार ४०२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यात ३१ ते ४० या वयोगटातील ६३ हजार २५६ तर १० वर्षांच्या खालील वयोगटातील १० हजार ८२३ रुग्णांचा समावेश होता. याआकडेवारीवरून करोनाचा फटका मोठय़ा प्रमाणात लहान मुलांना बसल्याचे स्पष्ट होते.
महापालिके कडून मिळालेल्या माहितीनुसार संपलेल्या एक वर्षांच्या काळात नागपुरात एकू ण २ लाख ९६ हजार ४०२ जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यात लहान मुलांची संख्या (१० वर्षांखालील) १० हजार ८२३ होती. फे ब्रुवारीपासून सुरू झालेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता एप्रिल महिन्यात वाढली. या महिन्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख १८ हजार ३४८ रुग्ण आढळून आले आहे. यातील ६० टक्के गृहविलगीकरणात असून त्यापैकी ५७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
करोना नियंत्रणासाठी महापालिके ने विविध उपाययोजना के ल्या आहेत. बाधितांची संख्या अधिक असलेल्या वस्त्यांमध्ये चाचण्यांसाठी फिरती पथके पाठवण्यात आली आहेत. गृहविलगीकरणातील रुग्णांवरही लक्ष ठेवले जात आहे. दवाखान्यात खाटा उपलब्ध नसल्याने दुसऱ्या लाटेत गुहविलगीकरणातील रुग्णांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. सध्या रुग्णालयातील खाटांच्या व्यवस्थापनासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून तेथे चोवीस तास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.