वर्धा : विविध कारणांनी नेहमी वादात राहणाऱ्या येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात सध्या तणाव आहे. विद्यापीठ परिसरातील कबीर टेकडी भागात संत तुकाराम महाराज यांचा पुतळा आहे. त्याची विटंबना झाल्याचे उघडकीस आल्यावर प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेत पोलीस तक्रार केली. मात्र, आज या प्रकरणाचे पडसाद उमटले व त्यामुळे परिसरात तणाव होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… बुलढाणा : ‘लालपरी’ गरम झाली अन् ट्रॅफिक ‘जाम’ झाली!

हेही वाचा… नागपूर: अन् चक्क पांढरे घुबड झाले कॅमेरात कैद

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ही घटना निंदनीय असल्याची भूमिका मांडत गांभीर्याने दखल घेण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली. संघटनेचे तुषार कथवटे, अभिषेक द्विवेदी यांनी ही प्रतिमा तोडण्याची मजल मारणारे विद्यापीठातीलच असावे असे सांगत त्यांचा निषेध करीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. रामनगर पोलीस याप्रकरणी चौकशी करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tension at mahatma gandhi international hindi university in wardha due to desecration of sant tukaram maharaj statue pmd 64 asj
Show comments