यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवारीवरून महायुतीत ताणतणाव असल्याचे आज कार्यकर्त्यांनी अनुभवले. आज रविवारी येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची आग्रही मागणी केली. त्याचवेळी शिवसेना (शिंदे गट) खासदार भावना गवळी यांनी या मतदारसंघावर आपलाच दावा असल्याचे सांगून ही जागा अन्य मित्रपक्षांना सोडण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे येत्या काळात या मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीत महावादाची शक्यता व्यक्त होत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने निवडणुकीचे रंणशिंग फुंकले आहे. ‘मकरसंक्राती’निमित्त महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मनोमिलन मेळावा शहरातील एका आलिशान हॉटेलात झाला. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, प्रा.डॉ. अशोक ऊईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, नामदेव ससाणे, अॅड. नीलय नाईक, इंद्रनिल नाईक यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षाचे नेते, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
महायुतीच्या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देण्याची आग्रही मागणी केली. यासाठी त्यांनी लोकसभा मतदारसंघातील बंजारा समाजाच्या स्थितीचा दाखल दिला. शिवाय आताच उमेदवार जाहीर करावा, म्हणजे प्रचार करता येईल अशी मागणी केली. सभागृहात उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना टाळ्या वाजत प्रतिसाद दिला. नाईकांच्या या मागणीने मंचावर उपस्थित इतर मित्र पक्षाच्या नेत्यांची चांगलीच अडचण झाली.
खासदार भावना गवळी यांनी आमदार नाईकांच्या मागणीचा धागा पकडत आपण या मतदारसंघात पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्याचा दाखला दिला. त्यामुळे येत्या निवडणुकीतही आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केला. महायुतीकडे दुसरी महिला कोण? असा प्रश्नही खासदार गवळी यांनी उपस्थित केला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी महिला उमेदवार देण्याची मागणी करीत प्रहारही निवडणूक लढू शकते, असा इशारा दिला.
खासदार-आमदारांनी दावा केला असला तरी आमदार मदन येरावार तसेच पालकमंत्री संजय राठोड या दोघांनीही या विषयावर बोलण्याचे टाळले. त्यामुळे महायुतीत कोणीही उमेदवारीचा दावा केला तरी प्रत्यक्ष निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याचा सूचक इशारा करत या मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे सांगत वादापासून दूर राहणे पसंत केले. निवडणुकीच्या आधी नेते तसेच पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होऊन निवडणुकीला सामोरे जाताना हेवेदावे नसावे हा या मेळाव्यामागचा उद्देश असला तरी मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतील हेवेदावे समोर आल्याने आगामी निवडणूक महायुतीसाठीही डोकेदुखीची ठरेल, अशी चर्चा मेळाव्यात रंगली होती.