Teosa Vidhan Sabha Election 2024 : तिवसा हे अमरावती जिल्ह्यातील शहर आहे. तिवसा तालुक्याला संतांचा आणि पौराणिक ठिकाणांचा इतिहास लाभला आहे. तालुक्यातील वारखेड हे संत अडकोजी महाराजांचे जन्मस्थान आहे. अडकोजी महाराज हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरू आहेत. मोझरी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्यस्थळ देखील तिवसा तालुक्यात आहे. तुकडोजी महाराजांच्या अनुयायांचे ते श्रद्धास्थान आहे. तालुक्यातील कौडण्यपूर गाव हे पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. कौडण्यपूर हे पौराणिक विदर्भ राज्याची प्राचीन राजधानी कुंदिनापुरीचे ठिकाण मानले जाते. धार्मिक तसेच संत परंपरा लाभलेल्या तिवसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेस नेत्या यशोमती चंद्रकांत ठाकूर करतात. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून यशोमती ठाकूर यांना पुन्हा या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्यासमोर कोणाचे आव्हान आहे जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा