ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने त्यांचा स्थापना दिवस मोठा धुमधडाक्यात साजरा केला. या स्थापना दिनाने कधी नव्हे ते विविध पक्षाच्या आमदारांचा एकत्र आणले. मात्र, त्याचवेळी मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना एका आमदाराने आंदोलनाची धमकी दिली आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पहिल्याच दिवशी या व्याघ्रप्रकल्पात भयाण शांतता अनुभवायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>जुनी पेन्शन, पदोन्नतीच्या मागणीसाठी’कॉस्ट्राईब’चे राज्यव्यापी आंदोलन; बुलढाण्यात निदर्शने

भारतातील पहिला व्याघ्रप्रकल्प होण्याचा मान मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला मिळाला. २२ फेब्रुवारी १९७४ला या प्रकल्पाचा शुभारंभ झाला आणि २२ फेब्रुवारी २०२३ ला या व्याघ्रप्रकल्पाने सुवर्णमहोत्सवी वर्षात पाऊल ठेवले. त्यामुळे राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प त्यांचा स्थापना दिन उत्साहात साजरा करत असताना मेळघाट व्याघ्रप्रकल्पात मात्र यादिवशी लहानमोठा कार्यक्रम देखील झाला नाही. एरवी कार्यालयातच असणाऱ्या क्षेत्रसंचालक या व्याघ्रप्रकल्पाच्या एका क्षेत्रात आग लागली म्हणून निघून गेल्या. वास्तविक ही छोटीशी आग होती, तो वणवा नव्हताच. त्यामुळे हे खरोखरच या व्याघ्रप्रकल्पाचे ५०वे वर्ष आहे का, असा प्रश्न पडला. मेळघाट व्याघ्रप्रकल्पासाठी, येथील वाघांच्या सुरक्षिततेसाठी आपले राहते घर सोडणाऱ्या मूळ आदिवासींना सोयीसुविधांपासून वंचित ठेवल्याने आमदार राजकुमार पटेल यांनी याच दिवशी आंदोलनाचा इशारा दिला आणि प्रशासन त्यांच्यापुढे नमले.

हेही वाचा >>>रेल्वे प्रवाशांवर तिप्पट भार; मुंबई एक्‍स्‍प्रेसच्या डब्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय, ‘रेल रोको’ आंदोलनाचा इशारा

मेळघाट फाउंडेशनच्या बैठकीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सुरुवात दणक्यात व्हायला हवी, असे सांगून त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र, त्यांच्याच सरकारला समर्थन करणाऱ्या या आमदाराने त्यांच्याच आश्वासनावर पाणी फेरले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrible silence in tiger project with threat of agitation by an nagpur mla rgc 76 amy