नागपूर : बेळगाव कारागृहातून ताब्यात घेतलेला दहशतवादी अफसर पाशा हा कार मेकॅनिक असून नोकरीसाठी सौदी अरेबियाला गेला होता. तेथेच त्याचा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध आला. सौदीतूनच तो ‘लष्कर-ए-तोएबा’ संघटनेत सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशात बॉम्बस्फोट आणि काश्मिरात दहशतवादी कारवाया करण्याच्या गुन्ह्यात दोषी आढलेला अफसर हा बंगळुरू शहरातील एका कामगाराचा मुलगा आहे. सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो एका गॅरेजमध्ये काम करीत होता. तो कारचे ‘रेडिएटर’ दुरुस्त करण्यात पटाईत होता. त्याला पत्नी व दोन मुली आहेत. त्याला एका नातेवाईकाने सौदी अरेबियात मेकॅनिक म्हणून नोकरीसाठी नेले होते. सौदीतील एका कार बनवणाऱ्या मोठ्या कंपनीत त्याला गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागली.

हेही वाचा >>>शोधा बघू! लोभस ‘ गोसावी ‘ हरवलाय कुठे?

तीन वर्षे काम केल्यानंतर त्याचा संपर्क पाकिस्तानातील लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी आला. भारतात राहून दहशतवादी कारवाया करण्यास मदत करण्याचे त्याने आश्वासन दिले. २००६ पासून तो दहशतवादी संघटनेशी जुळला. त्याच्याकडे कोट्यवधींच्या निधीची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी संघटनेने दिली होती. त्यामुळेच त्याने जयेश पुजारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींची खंडणी मागण्यास प्रवृत्त केले. गडकरींकडून जर १०० कोटी मिळाले असते तर त्या पैशातून त्याने स्लिपर सेल तयार केले असते, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

हेही वाचा >>>…अखेर ‘बाईपण भारी देवा’चे फलक झळकले

बांगलादेशात घेतले बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण

लष्कर-ए-तोएबा संघटनेचा अफसर पाशावर पूर्ण विश्वास बसला. त्यामुळे त्याला बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी बांगलादेशला पाठवण्यात आले. प्रशिक्षण घेतल्यानंतर लगेच एका कारच्या शोरुममध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची जबाबदारी दिली. पाशाने तेथे बॉम्बस्फोट करीत कामगिरी यशस्वी केली.

हेही वाचा >>>नागपूर शहरात रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ; सहा महिन्यात ५७६ अपघात, १४१ जणांचा मृत्यू

काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया

बांगलादेशातील यशस्वी कामगिरीनंतर त्याला लष्कर-ए-तोएबा संघटनेत नवीन सदस्य तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याने अनेक युवकांच्या कुटुंबीयांना लाखो रुपये देऊन संघटनेत सहभागी करून घेतले. याच दरम्यान तो पोलिसांच्या हाती लागला. बॉम्बस्फोट आणि संघटनेशी संबंध असल्यामुळे यूएपीए अक्ट अंतर्गत त्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झाली. ती शिक्षा तो बेळगाव कारागृहात भोगत होता. यादरम्यान त्याने अनेक स्लिपर सेल तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorist afsar pasha arrested from belgaum jail has connection with terrorist organization adk 83 amy