चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन नोंदणीसाठी नवे अधिकृत संकेतस्थळ http://www.mytadoba.mahaforest.gov.in येत्या चार ते पाच दिवसात सुरू होत आहे.
सध्या संकेतस्थळाची चाचणी सुरू आहे, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक तथा ताडोबाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. ताडोबा पर्यटनाच्या ऑनलाईन नोंदणीमध्ये चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या कंपनीने ताडोबा फाऊंडेशनची १२ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केली.
हेही वाचा… लाडक्या बाप्पाचे आगमन १८ की १९ सप्टेंबरला, जाणून घ्या…
त्यानंतर ताडोबा व्यवस्थापनाने नोंदणीकरिता सुरू असलेले http://www.mytadoba.org आणि https://booking.mytadoba.org हे संकेतस्थळ तत्काळ बंद केले होते. त्यामुळे आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनासाठी एकमेव अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात येत आहे.
हेही वाचा… ‘सीव्हीएसटी’ दुर्मिळ आजार! गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, दीड महिने व्हेंटिलेटरवर, मुलाचे काय झाले पहा..
यापुढे याच संकेतस्थळावरून नोंदणी होणार आहे, असे डॉ. रामगावकर यांनी सांगितले. चाचणी यशस्वी झाल्यानंतर चार ते पाच दिवसांत हे संकेतस्थळ नोंदणीसाठी उपलब्ध असेल. या संकेतस्थळावरूनच ताडोबासह देशभरातील तसेच राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्पाचीही ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.