नागपूर : नागपूर दौऱ्यावर असलेल्या बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो शिवसैनिक विमानतळावर गोळा झाले असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे अमरावती जिल्ह्यात अचलपूरला जाण्यासाठी दुपारी नागपूरला विमानाने पोहचले. राणे नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याना दिसताच शिवसैनिक संतप्त झाले व त्यांनी राणेंच्या विरोधात आक्रमक होत जोरदार घोषणबाजी केली . दरम्यान गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी राणे यांना मागच्या प्रवेशद्वारातून बाहेर काढले. व गाडीमध्ये बसवून रवाना केले. अचलपूरला आयोजित करण्यात आलेल्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने नितेश राणे रविवारी दुपारी नागपुरात पोहचले.

दरम्यान कळमेश्वर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक विमातळावर गोळा झाले होते. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तवत्यावरुन चर्चेत असलेले नितेश राणे विमानतळावरच्या बाहेर येत असल्याचे कळताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. राणे यांच्या स्वागतासाठी केवळ दहा ते बारा कार्यकर्ते बाहेर उभे होते. राणे बाहेर येत असताना पोलिसांनी त्यांना प्रारंभी आतमध्ये थांबण्यास सांगितले. परंतु शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याने पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता राणे यांना दुसऱ्या मार्गाने बाहेर काढण्यासाठी नियोजन केले. मात्र शिवसैनिकांना माहिती पडताच शेकडो शिवसैनिक त्या प्रवेशद्वाराकडे धावले आणि तिथे जाऊन त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी कार्यकर्त्याना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ठाकरे गटाचे कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात राणे विमानतळाच्या बाहेर काढले गाणि गाडीमध्ये बसून त्यांना विमानतळावरुन रवाना केले.

sillod assembly constituency uddhav thackeray campaign for suresh bankar maharashtra assembly elections 2024
ठाकरेंची सत्तारांविरोधात भाजपला साद मतभेद असतील तर बोलू; पण आधी सिल्लोडमध्ये पराभव करण्याचे आवाहन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
Priya Sarvankar on Amit Thackeray
‘त्या’ युवराजाला जनता कंटाळली, आता हा ‘राज’पुत्र काय करणार?, सदा सरवणकरांच्या मुलीची दोन्ही ठाकरेंवर जोरदार टीका
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”

हे ही वाचा…धक्कादायक… आता कमी वयातही हृदयरोग, डॉक्टर म्हणतात…

काय म्हणाले नितेश राणे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलल्या संविधानाने मला कुठेही जाण्याचा आणि सभा घेण्याचा अधिकार दिला आहे. मी ठाकरे गटावर टीका करत राहणार आहे. त्यांच्याकडे आता घोषणा देणे एवढेच काम उरले आहे. त्यांचा तेवढाच जीव राहिलाय. जी काही वाचलेली शिवसेना आहे. ती बंटी- बबली ( संजय राऊत, उद्धव ठाकरे) यांना खुश करण्यासाठी या घोषणा देत आहेत मात्र मला काही फारक पडत नाही., असे भाजप आमदार नितेश राणे म्हणाले.

हे ही वाचा…उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक घेताच ओबीसी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर

हा शिवसैनिकांचा संताप – आ. भास्कर जाधव

घोषणा देणारे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते. गेल्या काही दिवसांपासून राणे ठाकरे गटातील नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करीत आहे त्यामुळे कार्यकर्त्याचा राणे यांच्या विरोधात असलेला तो संताप आहे. ठाकरे गटाचा आणि खऱ्या शिवसैनिकांचा जोश काय असतो हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे, असे ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव म्हणाले.