चंद्रशेखर बोबडे

नागपूर : पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत ठाकरे गटाचे नेते येतील असा अंदाज बांधला जात होता व त्यासाठी प्रयत्नही सुरू होते. प्रत्यक्षात काहीच हाती येत नसल्याने शिवसेनेने मनसेलाच खिंडार पाडत या पक्षाच्या जिल्हा सचिवाला शिवसेनेत प्रवेश दिला. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्याबरोबर असलेले जिल्हा सचिव मनोज गुप्ता यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

 मनसेचे निरीक्षक व पदाधिकारी यांच्यावर नाराजी व्यक्त करीत गुप्ता यांनी सेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार कृपालजी तुमाने, जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश काशीकर, जिल्हाप्रमुख सूरज गोजे, युवा सेनेचे नीलेश तिघरे, कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे, शहर प्रमुख धीरज फंदी उपस्थित होते. सेनेतील बंडानंतर शिंदे यांच्याबरोबर जिल्ह्यातून रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल गेले. जयस्वाल हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी ते मूळचे शिवसैनिक आहेत. या दोन प्रमुख नेत्यांसह जिल्हाप्रमुख (ग्रामीण) संदीप इटकेलवार, मंगेश काशीकर यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. यापैकी अनेकांची प्रमुख पदांवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ठाकरे गटातील मोठय़ा नेत्याने शिंदे गटात प्रवेश केलेला नाही.

दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता व चिन्ह दिले. त्यानंतर मोठय़ा संख्येने शिवसैनिक व नेते शिंदेंच्या गटात प्रवेश करतील असा दावा केला जात होता. पक्ष प्रवेशाचे मुहूर्तही ठरवले जात होते. प्रत्यक्षात मनसेच्या एकाच्या नेत्याने प्रवेश केला. नागपूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. त्यापैकी रामटेक गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. गावागावात शिवसेनेच्या शाखा आहेत. अद्याप त्यात दुफळी दिसून येत नसली तरी ठाकरेंचे नेतृत्व मानणाऱ्या शिवसैनिकांची संख्या अधिक आहे. त्यांच्यावर शिंदेंच्या शिवसेनेचा डोळा आहे.

पक्ष नेत्यांचा दावा

 विदर्भातील बडे नेतेही अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असे  खासदार कृपाल तुमाने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले शिवसेनेची शिवधनुष्य यात्रा विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, सिंदखेडा राजा या भागातून जाणार आहे, असे ते म्हणाले.