अकोला: पातूर येथील १९ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण आले आहे. पीडितेची हत्या करण्यापूर्वी अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले. त्यानुसार या प्रकरणातील आरोपीविरोधातील गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
२७ जुलै रोजी रात्री तरुणी घरून बाहेर गेली होती. त्यानंतर ती परतलीच नाही. अखेर कुटुंबीयांनी तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पातूर पोलीस ठाण्यात दाखल केली. दरम्यान, २९ जुलै रोजी पातूर येथील शेत शिवारात जाणाऱ्या रस्त्यालगत एका काटेरी झुडपात तरुणीचा मृतदेह हात आणि गळा ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.
हेही वाचा… ‘सायकलिंग म्हणजे ध्यानसाधनाच’, म्हणतात सायकलवर देशभ्रमंती करणारे आयआयटीचे तज्ञ
तपासादरम्यान पातूर पोलिसांना गावातीलच गजानन बळकर याचे तरुणीच्या कुटुंबीयांसोबत वाद असल्याचे समोर आले. मग पोलिसांना गजाननवर संशय असल्याने त्याला ताब्यात घेतले. पीडितेची हत्या करण्यापूर्वी अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले. त्यामुळे गुन्ह्यामध्ये ३०२ सह ३७६, ३७७ भादंवि कलमाची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा… पावसाळ्यात “या” रानभाज्या खायलाच हव्यात; आरोग्यासाठी आहेत लाभदायक
दरम्यान, तरुणी बेपत्ता असताना पोलिसांकडून कुटुंबियांना सहकार्य मिळाले नाही. याअगोदर तीन वेळा आरोपीविरुद्ध तक्रार करूनही पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप झाला.