वर्धा : दिल्ली सरकार विरोधात केंद्राने काढलेल्या अध्यादेशाविरोधात आज आम आदमी पक्षाने रणरणत्या उन्हात धरणे देत संताप व्यक्त केला. पक्षाच्या दिल्ली सरकारला कायदे तयार करण्याचा व प्रशासनावर ठेवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र, त्या विरोधात केंद्राने अध्यादेश काढून आपला अधिकार कायम केल्याचा हा प्रकार लोकशाही विरोधी असल्याची टीका जिल्हाप्रमुख प्रमोद भोमले यांनी केली.
बजाज चौकात शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावत ‘मोदी सरकार होश मे आओ’चे नारे लावत धरणे दिले. दिल्ली सरकारची पुरेपूर फजिती करण्याचा हा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा देण्यात आला. पक्षनेते मंगेश शेंडे, ममता कपूर, प्रमोद भोयर, विविध आघाड्यांचे विक्रम रोकडे, धीरज टेकाम, अतुल उमाटे, शाहरुख पठाण, योगेश ठाकूर, धनंजय अग्रवाल, प्रदीप न्हाले, विशाल चौधरी, सुनील श्यामडीवल, सुरेश रंगारी व अन्य नेत्यांनी आंदोलनाची धुरा सांभाळली.