नागपूर : कोविड काळामध्ये ४५ दिवसांच्या अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आलेला खुनाच्या गुन्ह्यात नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी फरार झाला होता. दरम्यान नुकतेच लकडगंज पोलिसांनी त्याला छत्तीसगड येथून अटक करून पुन्हा कारागृहात दाखल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – निसर्गदत्त नियमांचे पालन करतो तो हिंदू – शरद पोक्षे

हेही वाचा – नागपूर : भारतीय दागिने विक्री महोत्सव सराफा व्यवसायाला देणार बळ, ३०० शहरांतील ३ हजार किरकोळ विक्रेत्यांचा सहभाग

विनोद लक्ष्मण जागरे (वय ४५) रा. मंगळवारी असे आरोपीचे नाव आहे. जागरे याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. याला २६ फेब्रुवारी २०२२ पासून ४५ दिवस आपत्कालीन (कोविड१९) अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते. रजा कालावधी संपल्यावरही तो हजर न झाल्याने त्याच्याविरुद्ध लकडगंज ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तेव्हापासून तो मिळून येत नव्हता. दरम्यान नुकतेच लकडगंज पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी जागरे यास रायगड (छत्तीसगड) येथून ताब्यात घेत, त्याला पुन्हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The absconding accused was arrested by lakadganj police from chhattisgarh adk 83 ssb
Show comments