चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची दोन दिवसांपूर्वी मानव संसाधन विभागात बदली झाली. बदली होताच त्यांनी कक्षातील एसी, टेबल, खुर्ची व शौचालयाचा दरवाजा काढून घेऊन गेले. या प्रकाराची जिल्हा पोलीस दलाच्या वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- यवतमाळ : घरात सनई-चौघड्याचे सूर, मुलगी बोहल्यावर चढली आणि आईने…

तत्कालीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या कार्यकाळात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे सर्वेसर्वा होते. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात स्वत:चा स्वतंत्र कक्ष तयार केला होता. स्वतंत्र वॉशरूम तथा बसण्यासाठी टेबल, खुर्ची आणि थंडगार वाऱ्यासाठी एसी देखील लावला होता. दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी जिल्ह्यातील ३४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची मानव संसाधन विभागात बदली केली. दोन दिवसांपूर्वीच खाडे कार्यमुक्त झाले. कार्यमुक्त होताच त्यांनी स्वत:च्या कार्यालयात लावलेला एसी, टेबल, खुर्ची आणि शौचालयाचा दरवाजा काढून घेऊन गेले. त्यांच्या जागेवर स्थानिक गुन्हे शाखेत आलेले पोलीस निरीक्षक हा सर्व प्रकार बघतच राहिले. या सर्व प्रकाराची पोलीस खात्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा- नागपूर: बुथपासून मतदान केंद्रापर्यंत सर्व काही, असे आहे भाजपचे वॉर रूम

एखाद्या अधिकाऱ्याला गृहखात्याचे या सुविधा उपलब्ध करून दिल्या नसतानाही संबंधित अधिकारी स्वखर्चाने या सर्व सुविधा स्वत:च्या कक्षात लावतो आणि त्याचा उपभोग घेतो, हा प्रकार आता पोलीस खात्यात रूळला आहे. या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पैसा येतो तरी कुठून, याचीही चर्चा सुरू आहे. स्वत:च्या पगारातून ते सर्व हे करतात का, अशीही विचारणा आता होत आहे.

हेही वाचा- भंडारा : दहावी-बारावीच्या परीक्षेचं ‘टेन्शन’?, बस एक फोन करा आणि ‘रिलॅक्स’ व्हा

विशेष म्हणजे, गृहखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्याच खात्यात अधिकारी स्वत:च्या सुविधांसाठी या चैनीच्या वस्तू लावतात आणि काढून नेतात हे कसे, अशीही विचारणा आता होत आहे. विशेष म्हणजे, या सर्व वस्तू स्वत: खरेदी केल्या होत्या असे खाडे माध्यमांशी बोलताना सांगत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The ac and toilet door were also taken away after being transferred by the police officer of chandrapur local crime branch rsj 74 dpj