संतापाच्या भरात न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाच्या दिशेने एका जामीनदाराने चप्पल भिरकावल्याची घटना भंडारा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. चप्पल फिरकावणाऱ्या जामीनदाराला पोलिसांनी अटक केली आहे.प्रवीण सीताराम वाघमारे (४८, रा. संत कबीर वॉर्ड) असे आरोपीचे नाव आहे. प्रवीणने गुरुवारी प्रथम श्रेणी न्यायालय क्रमांक १ मध्ये भादंवि कलम ३९५ गुन्ह्यातील एका आरोपीचा जामीन घेतला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जामीन घेण्यास नकार देत तो न्यायालयात पोहचला.

हेही वाचा >>> प्रेमाला भाषेचे बंधन नसते , वाचा मूकबधिर मैत्रीची प्रेमळ कथा

दुपारी ४ वाजताच्या सुमारास प्रथम श्रेणी न्यायालयात न्यायाधीशांच्या रिकाम्या खुर्चीच्या दिशेने त्याने चप्पल भिरवावली. यामुळे एकच खळबड उडाली. भंडारा शहर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ न्यायालय गाठून आरोपी प्रवीण वाघमारे याला अटक केली. त्याच्याविरूद्ध भादंवि ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader