नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात येत असलेल्या ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमात नागपूर विभागातील ७ हजार ७८ गावांपैकी आतापर्यंत ४ हजार ४५५ गावांमधून अमृत कलश तालुक्याला पाठवण्यात आला आहे. उर्वरित २,५२३  गावांमधून येणाऱ्या कलशांची प्रतीक्षा प्रशासनाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने देशभरात हा उपक्रम राबण्यात येत आहे. याअंतर्गत १ ते ३० सप्टेंबर दरम्यान विविध गावांमधून माती गोळा करून अमृत कलश पाठवायचे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी नागपूर विभागात या उपक्रमांतर्गत आतापर्यंत तयार झालेल्या अमृत कलशाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी त्यांना ७ हजार ७८ गावांपैकी आतापर्यंत ४ हजार ४५५ गावांमधून अमृत कलश तालुक्याला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. उर्वरित गावांमध्ये या उपक्रमला गती द्या, लोकसहभाग वाढवा, अशा सूचना बिदरी यांनी दिल्या. १ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ग्रामपंचायतींकडून आलेले अमृत कलश पंचायत समिती कार्यालयात जमा करायचे आहे.

हेही वाचा >>> कुर्मी समाजाच्‍या आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर रेल्‍वे वाहतुकीत बदल; ‘या’ गाड्या भुसावळ, बडनेरापर्यंतच धावणार…

तेथून तालुका कार्यालयात पाठवायचे आहे. २२ ते २७ ऑक्टोबर दरम्यान राज्यात सर्व तालुक्यातील कलश मुंबई येथे गोळा करतील. यानंतर २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमासाठी हे युवक रवाना होतील. १ नाव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातील ‘अमृत कलश’ महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमात अमृत वाटिकेमध्ये वापरण्यात येणार आहेत. बैठकीला विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. उपायुक्त (विकास) डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त (प्रशासन) प्रदीप कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.