सध्या नागपूरचा पारा हा ४१ अंश सेल्सियाच्या वर पोहचला आहे. दुपारच्या वेळेला नागपूरकरांना प्रचंड उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिर प्रशासनाने गणेश भक्तांना या उष्णतेच्या लाटांपासून दिलासा मिळावा यासाठी मंदिरांच्या प्रवेश दारावर स्प्रिंकलर लावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्या माध्यमातून निघणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांनी वातावरण थंड होत असल्याने गणेश भक्तांना दर्शनाआधीच प्रसन्न वातावरणाची अनुभूती येत आहे. या संदर्भात मंदिराचे अध्यक्ष विकास लिमये यांनी सांगितले, की मंदिरात दररोज मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे ही व्यवस्था केली आहे. या ठिकाणी सहा स्प्रिकलर लावले आहे. गणेशमूर्तीच्या शेजारी कुलर आणि एसी लावले आहे.