चंद्रपूर : जंगल सफारी करताना आक्रमक झालेला पट्टेदार वाघ पर्यटकांच्या जिप्सीच्या दिशेने डरकाळी फोडत धावल्याने पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. डरकाळी फोडत पर्यटकांच्या जिप्सीवर धावून गेलेल्या वाघाचा व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच सार्वत्रिक झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उन्हाळा सुरू होताच पर्यटक जंगल सफारीसाठी व्याघ्र प्रकल्पामध्ये तथा अभयारण्यात जातात. वाघ, बिबट, हत्ती, अस्वल, हरीण, चितळ, सांबर, कोल्हा, नीलगाय यासोबतच इतर वन्य प्राण्यांच्या सोबतीने जंगलात भ्रमंती करतात. अशाच एका जंगलात पर्यटक जंगल सफारीसाठी गेले. जिप्सीतून जंगल सफारी करीत असताना अचानक पट्टेदार वाघ डरकाळी फोडत जिप्सीच्या दिशेने येतो. आक्रमकरित्या डरकाळी फोडणारा वाघ जिप्सीच्या दिशेने धावत असल्याचे बघून पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडते. वाघाला बघून घाबरलेले पर्यटक चालकाला जिप्सी मागे घेण्यास सांगतात. जिप्सी चालक कसाबसा जिस्पी मागे घेतो तरीही वाघाची डरकाळी सुरूच असते. वाघाचा अक्राळविक्राळ चेहरा पाहून जिप्सीतील सारेच पर्यटक घाबरतात.

हेही वाचा – स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प; बारसूतील प्रस्तावित रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका

मात्र काही वेळातच वाघ जंगलात आत निघून जातो. वाघ गेल्याचे बघून पर्यटक पुन्हा त्याच मार्गाने शांततेत निघून जातात. वाघाच्या आक्रमक डरकाळीचा हा व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच सार्वत्रिक झाला आहे. हा व्हिडीओ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील असल्याची चर्चा समाज माध्यमावर सुरू असली तरी हा व्हिडीओ ताडोबातील नाही, अन्य जंगलातील असावा अशी माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यापूर्वीदेखील ताडोबाच्या नावावर असे अनेक व्हिडीओ समाज माध्यमावर सार्वत्रिक केले गेले. जेव्हा की ते ताडोबा प्रकल्पातील नव्हते. तेव्हा समाज माध्यमावर अशा प्रकारे व्हिडीओ टाकताना संबंधितांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वन्यजीव प्रेमींनी केले आहे.