यवतमाळ : राज्यातील अंगणवाडी सेविकांचे गेल्या २३ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. मात्र शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी त्यांना नोकरीवरून कमी करण्याचे परिपत्रक काढल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

येथील अंगणवाडीताईंनी शासनाच्या परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त केला. शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवित हाती चप्पल घेऊन नारेबाजी केली. गेल्या ४ डिसेंबरपासून अंगणवाडीताई बेमुदत संपावर आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद आहे. बालकांचे पोषण व जडणघडण करण्यासोबतच राज्य शासनाच्या सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करीत असतात.

हेही वाचा >>>…मागेल त्याला विहीर, नावापुरतीच! दलाल सक्रीय, मंजुरीसाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट

शालेय पूर्व अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांचा पोषण आहार ही सर्व कामे बेमुदत संपामुळे बंद आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पद वैधानिक असल्याने त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून वेतन देण्यात यावे. वेतनश्रेणी, भविष्य निर्वाण निधी, सामाजिक सुरक्षा, आदी सर्व लाभ देण्यात यावे. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये व मदतनिसांना २० हजार रुपये दरमहा मानधन देण्यात यावे, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचारी २३ दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन करत आहे.

हेही वाचा >>>‘ब्लँकेट दान द्या, मायेची ऊब पांघरा’ व्हिजेएमचा उपक्रम

शुक्रवारपर्यंत आंदोलनाची पूर्तता न झाल्यास अंगणवाडी सेविका जेल भरो आंदोलन करणार आहे. या आंदोलनात अशोक भुतडा, विजया सांगळे, पल्लवी रामटेके, जया सावळकर, अनिता कुलकर्णी, हुकूम ठमके, विजया जाधव, लीला काळे, आशा काळे, रमा गजभार, रचना जाधव,रुख्मिणा पवार, अनुसया गायकवाड, कविता कदम, लता माटे, ज्योती येराकार, मनीषा कुटे, प्रमिला मलकापुरे, प्रणिता राजूरकर, सुनीता पवार, अलका भागवत, चंदा लिंगणवार आदी सहभागी झाले होते.दरम्यान वणी उपविभागात अंगणवाडी सेविकांना बुधवारी जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनास मनसेने जाहीर पाठिंबा देऊन शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

Story img Loader