कवी संजय इंगळे लिखीत संमेलनस्थळाचे महत्त्व सांगणाऱ्या ‘वर्धा गौरव’ गीतावर शिक्कामोर्तब झाले असून ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी गायल्या जाणार आहे. यंदा स्वागतगीत सादर न करण्याचा निर्णय झाला आहे.

हेह वाचा- चंद्रपूरकरांनी ‘पदवीधर’मध्ये साथ दिली, नागपूरकर ‘शिक्षक’मध्ये परतफेड करणार’; माजी मंत्री सुनील केदार यांची ग्वाही

Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
actor jitendra joshi speech in Sarva Karyeshu Sarvada Event
सामाजिक काम करणाऱ्यांना आपलेसे करा!
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
Pakistani fan 3 crore gifts for mika singh
भारतीय गायकाचे दिलदार पाकिस्तानी चाहते, भर मंचावर दिल्या ‘इतक्या’ कोटींच्या भेटवस्तू, व्हिडीओ व्हायरल
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल

ज्या गावात संमेलनाचे आयोजन केल्या जाते, त्या गावाचे स्थानमहात्म्य सांगणारे गीत संमेलनात सादर केल्या जात असते. वर्धेत संमेलनाचे आयोजन होत असल्याने वर्धेचा इतिहास, महापुरुषांचे कार्य, ऐताहासिक स्थळे, गावांची वैशिष्ट्ये आदी स्वरूपात हे गौरवगीत तयार झाले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेचे अध्यक्ष असलेले कवी व गझलकार संजय इंगळे तिगावकर यांच्या सिद्धहस्त लेखनीतून गौरवगीत साकारले आहे. यास अजय हेडावू यांनी संगीत दिले आहे. एकूण नऊ कडव्यांचे हे गीत आहे. मात्र वेळेअभावी पहिले, दुसरे, तिसरे, सातवे व नववे कडवे संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी म्हटल्या जाईल. एकूण ५३ गायकांची चमू हे गीत सादर करणार असून त्यात विविध महाविद्यालयाच्या संगीत शिक्षकांचा समावेश असेल. यावेळी स्वागतगीत सादर न करण्याचा निर्णय झाला आहे. पण, कवी सुरेश भट यांचे ‘लाभले अम्हास भाग्य’ हे गीत सादर केले जाणार आहे.

हेही वाचा- धक्कादायक…! जिल्हा परिषद शाळेतील अकरा विद्यार्थ्यांना ‘ब्रॉयलर चिकन’ खाल्ल्याने विषबाधा

॥ वर्धा गौरव गीत॥

सकल जनांची, सजग मनांची वरदायिनी वर्धानगरी।
ही शांतीची, ही क्रांतीची कर्मभूमी वर्धानगरी॥
बंधुभाव अन् सत्य अहिंसा
शिकवी इथली माती
वृक्षवेलींवर पक्षी जिथले
गीत समतेचे गाती
विश्वशांतीचे सूर उमटती धरती अंबरावरी ॥१॥
ही शांतीची, ही क्रांतीची कर्मभूमी वर्धानगरी॥

स्वातंत्र्याचे स्वप्न जागले
अमुच्या मनामनातून
अन् चरख्याचे चक्र फिरले
इथल्या घराघरातून
अजुनी धागा जपते आहे ही खादीपंढरी ॥२॥
ही शांतीची, ही क्रांतीची कर्मभूमी वर्धानगरी॥

कळस नि छप्पर नसे जयाला
अद्भूत मंदिर येथे
कोरीव रेखीव शिळा येथली
नित्य गीताई गाते
‘जय जगत’चा नारा घुमला अवघ्या विश्वावरी ।।३।।
ही शांतीची, ही क्रांतीची कर्मभूमी वर्धानगरी ।।

वर्धा वेणा धाम यशोदा
गात्रातुनी वाहती
सातपुड्याच्या पर्वतरांगा
उष्ण वारे साहती
हिरवाईच्या स्वप्नास्तव करू वृक्षांची चाकरी ।।४।।
ही शांतीची, ही क्रांतीची कर्मभूमी वर्धानगरी।।

वैभवाच्या स्मृती जागवी
दिल्ली दरवाजा
इथला कापूस आंग्लदेशीच्या
जाई बाजारा
अभयारण्ये अन् धरणांची, नीलपंखाची नगरी ।।५।।
ही शांतीची ही क्रांतीची कर्मभूमी वर्धानगरी।।

भेदभाव विसरून जगाचे
जपतो आम्ही नाती
कर्मयोगी माणूस इथला,
सुपीक इथली माती
तूर हरबरा गहू असे परी आठविते बाजरी ।।६।।
ही शांतीची, ही क्रांतीची कर्मभूमी वर्धानगरी।।

मंदिर मस्जिद चर्च नांदती
येथे एकदिलाने
आणिक इथल्या विहारातुनी
प्रबोधनाचे गाणे
स्वावलंबन रुजवू पाहे नई तालीम अंतरी ।।७।।
ही शांतीची, ही क्रांतीची कर्मभूमी वर्धानगरी।।

अध्यात्माच्या अंगणी आले
विज्ञानाचे वारे
सकलजनास्तव खुली जाहली
मंदिराची दारे
आष्टीचा संग्रामही घडवी बोलांतुनी खंजिरी ।।८।।
ही शांतीची, ही क्रांतीची कर्मभूमी वर्धानगरी।।

पालकवाडी झाले वर्धा,
प्रवरपूर पवनार
शेगावाला स्पर्श लाभता
झाले सेवाग्राम
राष्ट्रभाषेचा गौरव अमुच्या मायमराठी घरी ।।९।।
ही शांतीची, ही क्रांतीची कर्मभूमी वर्धनगरी।