वाशीम : कारंजा तालुक्यात मंगळवार रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने विळेगाव येथील ज्ञानेश्वर राठोड वय ४० हे पुरात वाहून गेले. त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही.वाशीम जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवार रात्रीपासून रिमझिम पाऊस होत आहे. तर कारंजा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. विळेगाव येथील शेतकरी सकाळी शेतात जात असताना पुलाजवळील भाग खचला व पुराच्या पाण्यात ज्ञानेश्वर राठोड पडून वाहून गेले. जिल्ह्यात दोन दिवसापासून कुठे रिमझिम तर कुठे दमदार पाऊस होत आहे.

कारंजा तालुक्यात मंगळवार ११ जुलै रोजी रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. आज १२ जुलै रोजी ज्ञानेश्वर राठोड शेतात जात असताना विळेगाव ते जामठी रस्ता पुरामुळे खचला, नदीला आलेल्या पुरामुळे सदर शेतकरी वाहून गेला. त्यांचा अद्यापही शोध लागलेला नसून घटनास्थळी ग्राम पंचायत व शोध पथक दाखल असून शोध कार्य सुरू होते. कारंजा तालुक्यात दुपारनंतर पुन्हा जोरदार पाऊस होत आहे. तसेच मालेगाव, वाशीम मध्ये देखील चांगला पाऊस झाला तर इतर ठिकाणी तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे.