गडचिरोली : भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला. नक्षलविरोधी अभियानादरम्यान अहेरी तालुक्यातील पेरमीली हद्दीत येणाऱ्या वेडमपल्ली परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. चकमकस्थळावरून एक पिस्तुल, भरमार बंदुकीसह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली जंगल  परिसरात दुपारी २ वाजताच्या सुमारास नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दडून असलेल्या जवळपास २० ते २५ नक्षल्यांनी पोलिसांच्या विशेष पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार केला. दरम्यान पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. यावेळी चकमकस्थळी १ पिस्तुल,१ भरमार बंदूक,१ वॉकीटॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य आढळून आले.

हेही वाचा >>> ‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वरून ओळख वाढविताना सावधान!

भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षली मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने त्यांचा डाव उधळून लावण्यात आल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे आहे. पोलीस जवानांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कौतुक केले आहे. मागील काही दिवसांपासून दक्षिण गडचिरोली परिसरात नक्षल्यांच्या हालचाली वाढल्या आहे. त्यामुळे या भागात पोलिसांनी देखील नक्षलविरोधी नक्षलविरोधी अभियान वाढवण्यात  आले आहे. हे विशेष.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The assassination of the naxals police naxal encounter in vedampally forest area nagpur ssp 89 ysh