नागपूर: वर्धा, सोनेगाव, हिंगणघाट, नागपूर, वरोरा, येथील नागरिक मोठ्या संख्येने चंद्रपूर-बल्लारशा येथून निघणाऱ्या ‘मेमू रेल्वे’ने प्रवास करतात. यामध्ये महिला व विद्यार्थिनींचा समावेश आहे. बल्लारशा येथून दररोज सायंकाळी पाच वाजता सुटणारी बल्लारशा वर्धा मेमू रेल्वे १७ ऑक्टोबरपासून दररोज दोन ते चार तास उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिलांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही रेल्वे वेळेत सोडण्यात यावी, अशी मागणी ‘वी फॉर चेंज’ या संघटनेने केली आहे.

विद्यार्थिनी आणि महिला रेल्वेस्थानकावर किमान तीन तास थांबत असल्याने काही मवाली, गुंड त्यांच्याशी गैरवर्तन करतात, त्यांची छेड काढताना दिसतात. प्रवासी मुली तक्रार करायला घाबरतात. हे चित्र चंद्रपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच पाहायला मिळते. बल्लारशा वर्धा मेमू रेल्वेच्या वेळापत्रकाबद्दल किंवा उशिरा येण्याविषयी रेल्वेस्थानकावर कोणतीही घोषणा आणि सूचना दिली जात नाही. त्यामुळे महिला प्रवासी रेल्वेची वाट पाहत बराच वेळ ताटकळत बसतात. यामुळे महिला प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

IIT Mumbai, JEE toppers, IIT Mumbai latest news,
जेईईत अव्वल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची आयआयटी मुंबईला पसंती
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
motorman, Railway, Forced retirement punishment,
मुंबई : आमचा प्रश्न… कामातील चुकांमुळे मोटरमनला सक्तीच्या निवृत्तीची शिक्षा ?
Students are scared due to rush of vehicles in front of Charisma Primary and Secondary school in Nagpur
भरधाव वाहनांमुळे विद्यार्थी भयभीत! नागपुरातील ‘या’ शाळेसमोरील स्थिती; अपघाताची टांगती तलवार…
Central Railway decision to revise the charges of coolies Mumbai
मुंबई: हमालांच्या शुल्कात १० रुपयांनी वाढ
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
The Medical Education Department has decided to take action against colleges that charge admission fees Mumbai news
प्रवेशाच्या वेळी शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा
Mumbai cet cell
अर्जामध्ये चुकीची टक्केवारी नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी कक्षाकडून दिलासा, एमबीएच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी

हेही वाचा… ‘त्या’ हत्याकांडाचा अखेर उलगडा, आरोपीला रावणवाडीतून अटक; कौटुंबिक वादाचा थरारक अंत

प्रवाशांनी वैयक्तिकरित्या आणि प्रवासी संघटनेसारख्या संघटनांनी वर्धा, हिंगणघाट, वरोरा, बल्लारशा, चंद्रपूर येथील स्टेशन मास्तरांना निवेदने दिली, पण यातून काहीही साध्य झाले नाही. या संदर्भात ‘वी फाॅर चेंज’ संघटनेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांना निवेदन दिले. विद्यार्थिनी आणि महिला प्रवाशांची होणारी गैरसोय आणि असुरक्षितता लक्षात घेऊन मेमू रेल्वे वेळेत सोडण्यात यावी, अशी मागणी संस्थेच्या संस्थापक प्रा. डॉ. रश्मी पारसकर सोवनी, सुजाता लोखंडे, रश्मी पदवाड मदनकर, डॉ. चित्रा गुप्ता तूर, डॉ. नंदाश्री भुरे, अनघा वेखंडे, भवरी गायकवाड, कृतिका सोनटक्के, प्राची गायकवाड यांनी केली.