पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी बेपत्ता झाले होते. या मुलांचे एका चारचाकी वाहनात मृतदेह सापडले आहेत. एकाच वेळी तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शनिवारी सायंकाळी सहा वर्षे वयोगटातील तीनही मुले टेका नाकाजवळील फारुख मैदानावर खेळत होते. रात्र झाली तरी घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी लगेच त्या भागातील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले. परंतु, मुलांचा छडा लागला नाही.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

हेही वाचा >> नागपूर: तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण, पोलिसांकडून शोध सुरू

“या मुलांचे मृतदेह फारुख नगर येथील मैदानात पार्क केलेल्या एका जुन्या कारमध्ये सापडले. ही मुलं त्या कारमध्ये खेळत होती. खेळता खेळता ही मुलं गाडीमध्ये लॉक झाली. त्यामुळे त्यांना बाहेर पडणं मुश्किल झालं. या मुलांचा गुदमरून आणि उष्णतेमुळे मृत्यू झाला”, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

मृत झालेल्या मुलांमध्ये दोन भावंडे आणि त्यांची एक मैत्रीण होती. एकाचवेळी परिसरातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सायंकाळपासून ही मुलं सापडत नव्हती. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा शोध लागला नसल्याने त्यांचं अपहरण झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतु, नंतर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. या मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Story img Loader