लग्न झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच नवरीचा इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून पडून मृत्यू झाला. सुषमा इंगळे (२४, रा. सावनेर) अशी मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी सावनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- बुलढाणा : रविकांत तुपकरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नागपुरातील वाठोड्यात राहणाऱ्या सुषमा हिचा गेल्या १५ दिवसांपूर्वीच नरेश इंगळे यांच्याशी विवाह झाला होता. नरेश हे एका रुग्णालयात लँब टेक्निशियन म्हणून नोकरी करतात. लग्नानंतर दोघेही सावनेरातील छिंदवाडा रोड, जनता लॉनजवळील जटाशंकर लेआऊटमध्ये किरायाने राहायला गेले होते. दोघांचाही सुखी संसार होता. शनिवारी सकाळी नरेश इंगळे हे नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. सुषमा ही एकटीच घरात होती. दुपारी एक वाजताच्या सुमारात तिसऱ्या माळ्यावरून सुषमा खाली पडली. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा- “संकटात आम्ही संजय राठोड यांच्यासोबत होतो”, मुख्यमंत्री शिंदेंचे विधान; म्हणाले, “पूजा चव्हाण प्रकरणात…”

तिच्या शरीरावर तसेच पोटावरही मारहाणीच्या खुणा होत्या. घरात धारदार काच आणि रक्ताचे डागही मिळाले. त्यामुळे सुषमाच्या मृत्यूवर संशय निर्माण झाला आहे. या प्रकाराची सर्वोतोपरीने चौकशी आणि तपास करण्यात येईल, अशी माहिती सावनेरचे ठाणेदार मारोती मुळूक यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bride fell from the third floor of the building and died in just 15 days after the marriage in nagpur adk 83 dpj