बुलढाणा: आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागाला दिवाळीने मदतीचा मोठा हात दिला. केवळ ११ दिवासातच विभागाला तब्बल ५ कोटी ४४ लाख रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळाले. यादरम्यान १५ लाखांवर प्रवाशांची विक्रमी वाहतूक करण्यात आली.

यंदाच्या दिवाळीत बुलढाणा एसटी विभागाने जे नियोजन केले होते त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आल्याने विक्रमी उत्पन्न मिळाले. बस गाड्यांची दुरवस्था, अपुरे कर्मचारी या अडचणी असतानाही विभागाने चांगली कामगिरी बजावली. ८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान ७ आगारातून बसेसनी तब्बल १६ लाख ४३ हजार ४०८ किलोमीटरचा प्रवास केला.

हेही वाचा… नागपूरमध्ये रेल्वे तिकीटांचा काळाबाजार

याद्वारे १५ लाख ९ हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. यामध्ये महिलांचा मोठा वाटा असून ५ लाख ५५ हजार ६२० महिलांनी (माहेर व सासर असा दुहेरी) प्रवास केला. सुमारे साडेपाच कोटींच्या उत्पन्नात बुलढाणा आगार( एक कोटी चार लाख रुपये) आघाडीवर असून ९१लाख ६१ हजार उत्पन्नासह मेहकर आगार दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Story img Loader