बुलढाणा: तालुक्यातील देऊळघाट ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र सादर करण्याचा पराक्रम करणाऱ्या चौघा उमेदवारांविरुद्ध बुलढाणा पोलिसांनी उशिरा का होईना गुन्हा दाखल केला आहे. चौघा आरोपीमध्ये सख्ख्या भावांचा समावेश आहे.
ग्रामपंचायतच्या निवडणुकीदरम्यान देऊळघाट येथील ४ उमेदवारांनी खोटे कागदपत्र वापरून शासनाची दिशाभूल केली. खोटे जात प्रमाणपत्र तयार करून निवडणुकीत आपले नामांकन पत्र बुलढाणा तहसील कार्यालयात दाखल केले होते. ही बाब बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या निदर्शनास आली. इस्माइल खान मोहम्मद खान, परविनबी जावेद खान, बानोबी सरदार खान, इब्राहिम मोहम्मद खान यांनी हा पराक्रम केला.
हेही वाचा… सालगड्याची मुलगी बनली पोलीस उपनिरीक्षक; पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी
प्रकरणी नायब तहसिलदार अमरसिंह पवार यांनी बुलढाणा शहर पोलिसांकडे तक्रार दिली. २० जुलै २०१५ ते २ मे २०२३ दरम्यान झालेल्या निवडणुक प्रक्रियेमध्ये या चौघानी नामांकन अर्ज दाखल करून निवडणूक लढवून विभागाची फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद होते. प्रकरणाचा तपास शहर पोलीस करीत आहे.