वाशीम जिल्हयात सहकार क्षेत्रातील बाजार समित्यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यासोबतच जिल्हयातील ग्राप पंचायतच्या पोट निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापणार आहे. यामध्ये जिल्हयातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लाबली आहे.राज्य निवडणूक आयोगाने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत विविध कारणामुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/ थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकीसाठी ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. जिल्हयातील ५५ ग्रामपंचायतीच्या एकूण ९२ रिक्त सदस्यांसाठी आणि ५ रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी येत्या १८ मे रोजी निवडणूकीसाठी मतदान होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>वर्धा : गळाच्या रथयात्रेसाठी माहेरवाशिणी सज्ज; तीनशे वर्षांची परंपरा आजही धडाक्यात

यामध्ये वाशीम तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीचा समावेश असून २९ ग्रामपंचायत सदस्यांची रिक्त पदे आहेत. मालेगांव तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या १० ग्रामपंचायत सदस्यांची रिक्त पदे व १ सरपंच पद रिक्त आहे. रिसोड तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या ६ सदस्यांसाठी, मंगरुळपीर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांसाठी आणि १ सरपंच पदासाठी, कारंजा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या १५ रिक्त सदस्यांसाठी आणि १ सरपंच पदासाठी तर मानोरा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या २१ सदस्यांसाठी आणि २ सरपंच पदासाठी हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यामुळे बाजार समित्यांपाठोपाठ ग्राम पंचायतच्या निवडणुकांमूळे चांगलीच रंगत येणार आहे.