वर्धा: प्राप्त माहिती आधारे वर्धा रेल्वे स्थानकावर रेल तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती नागपूरच्या सीबीआय पथकास लागली होती. त्यांनी वर्धा रेल्वे पोलीसांची मदत घेत काळाबाजार करणाऱ्या बाबा अभिमान पाटील यास अटक केली आहे.

गुप्त पाळत ठेवल्यावर पाटील हा स्लीपर क्लासचे तात्काळ तिकीट काढत असल्याचे दिसून आले.त्याला पकडल्यावर एक तिकीट, दोन दुसऱ्या दिवशीचे तिकीट आरक्षण अर्ज सापडले. हिसका बसताच त्याने काळाबाजार करत असल्याची कबुली दिली.

हेही वाचा… समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल; निर्वाह भत्त्यापासून वंचित, स्पर्धा परीक्षेची पुस्तकेही नाहीत

तो प्रती तिकीट दोनशे रुपये प्रवस्याकडून घेत होता. यापूर्वी एकदा स्थानिक दयाळ नगर भागात चालणारा तिकिटांचा काळाबाजार रेल्वे पोलीसांनी बंद पाडला होता.

Story img Loader