नागपूर: केंद्र सरकारने महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केल्याने हॉटेलचे जेवण व अल्पोपहार महागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या घरघुती सिलिंडरच्या किंमतीत दोनशे रूपये कपात करून गृहिणींना दिलासा दिला होता. यावेळी केंद्र सरकारने सिलिंडरचे दर वाढवताना घरघुती सिलिंडरला वगळले. मात्र व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणले जाणा-या सिलिंडरच्या किमतीत घसघशीत म्हणजे २०० रूपयांहून अधिकची वाढ केली आहे.

हेही वाचा… राज्यात पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्याची शक्यता

नागपूरमध्ये पूर्वी हे सिलिंडर १७०६ रूपयांना मिळत होते. आता ते १९०८ रुपयात मिळणार आहे. नागपूरमधील सिलिंडर वितरक एजन्सीचे संचालक निशांत गांधी यांनी दरवाढ झाल्याचे सांगितले. व्यावसायिक सिलिंडर महागल्याने हॉटेलचे पदार्थ महागण्याची शक्यता आहे. त्याची झळ ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. त्यामुळे नाराजी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The central government has hiked the rates of commercial cylinders cwb 76 dvr
Show comments