लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ओळखपत्राचा गोंधळ समोर आला होता. त्यानंतर आता राज्य सामायिक परीक्षा म्हणजे सीईटी सेलने नवीन गोंधळ केला आहे.

बी.एड. अभ्यासक्रमासाठी सध्या सीईटी सेलकडून प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रामध्ये बुधवार २६ एप्रिलच्या तारीख देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र हा पेपर कालच झाला असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला असून सीईटी सेलच्या चुकीने वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा… गडचिरोली: पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र; वनरक्षकासह सात जण अटकेत

सीईटी सेलने अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी प्रियदर्शनी महाविद्यालयात परीक्षा केंद्र म्हणून दिले होते. विद्यार्थी या केंद्रावर सकाळी ९ वाजता पोहोचले. परंतु, विद्यार्थी तेथे जाताच ही परीक्षा मंगळवारी सकाळी रायसोनी महाविद्यालयातील केंद्रावर झाली असे सांगण्यात आले. विद्यार्थी संख्या वाढल्याने अचानक परीक्षा केंद्र आणि तारीख बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांना आधी तशी कुठलीही सूचना देण्यात आली नाही.

हेही वाचा… चंद्रपूर: जन्मजात हृदयरोग व विविध आजार असलेल्या ६ हजार बालकांवर माेफत शस्त्रक्रिया

परिणामी विद्यार्थी त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्राच्या आधारे बुधवारी परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र सीईटी सेलच्या चुकीमुळे त्यांना परीक्षाच देता आली नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The cet cell made a mess by putting the next days date on the exam id card in nagpur dag 87 dvr
Show comments