मागील चार दिवसांपासून संपावर असलेल्या तीस हजारांवर कर्मचाऱ्यांच्यावतीने आज शुक्रवारी जिल्ह्यातील तेरा तालुका स्थळी दुचाकी वाहन रॅली काढण्यात आली. बुलढाण्यातील रॅलीच्या प्रारंभी हाती फलक घेऊन उप मुख्यमंत्र्यांची विनवणी करणारा बालक सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.
हेही वाचा >>>१५ दिवसांच्या बाळाला सोडून विवाहितेची सर्वोपचार रुग्णालयात आत्महत्या
जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाण्यासह जिल्ह्यातील तेरा तालुकास्थळी आज एकाच दिवशी व एकाच वेळी रॅली काढण्यात आली. बुलढाण्यात स्थानिय जयस्तंभ चौकातील राजमाता जिजामाता व्यापार व क्रीडा संकुल येथून रॅलीला सुरुवात होईल. तेजराव सावळे, किशोर हटकर, गजानन मोतेकर, प्रशांत रिंढे, माधुरी मोरे, अमोल टेंभे यांच्या मार्गदर्शनात ही रॅली काढण्यात आली. जिजामाता संकुल, जनता चौक, कारंजा चौक, चिखली मार्गावरील सोसायटी पेट्रोल पंप, सर्क्युलर मार्ग , चिंचोले चौक, बस स्थानक अशी ही रॅली निघाली. जिजामाता संकुलात समारोप करण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग रॅलीचे एक वैशिष्ट्य ठरले.