भंडारा : दलाई लामा यांच्यानंतर तिबेटचे दुसरे सर्वोच्च धर्मगुरू ११ वे पंचेन लामा यांची चीनने तत्काळ सुटका करावी आणि मानसरोवर यात्रेवरील शुल्क व बंदी हटवावी, अशी मागणी भारत-तिबेट मैत्री असोसिएशनने केली आहे. प्रदेशाध्यक्ष अमृत बनसोड यांच्या सूचनेवरून झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दलाई लामा यांनी १४ मे १९ रोजी तिबेटचे अकरावे पंचेन लामा घोषित केल्यानंतर अवघ्या  तीन दिवसांनी १७ मे रोजी चीनने सहा वर्षीय धुन चोक्या निमा आणि त्यांच्या कुटुंबाला राजकीय कैदी म्हणून अटक केली. 

तरीही चीन सरकार ही माहिती सार्वजनिक करत नाहीये. ते कुठे आहेत आणि कसे आहेत. चीन सरकारने याबाबत पूर्ण गोपनीयता पाळली आहे. अकरावे पंचेन लामा, दशकातील सर्वात तरुण राजकीय कैदी असून आता ते ३४ वर्षांचे झाले आहेत. ते २७ वर्षांपासून चीनच्या ताब्यात आहेत. त्यांना सोडविण्यासाठीच्या या अभियानांतर्गत भंडारा शाखेतून पंतप्रधानांना जास्तीत जास्त पोस्टकार्ड पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत गुलशन गजभिये, महेंद्र गडकरी, मोरेश्वर गेडाम, मनोहर गणवीर, महादेव मेश्राम, दादाजी कोचे, मनीष वासनिक, अर्जुन गोडबोले, आहुजा डोंगरे, रूपचंद रामटेके, करण रामटेके आदी उपस्थित होते.

how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
loksatta readers feedback
लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार?
Rahul and Priyanka Gandhi ani
“राहुल व प्रियांका गांधींच्या विजयामागे कट्टरपंथी मुस्लीम आघाडीचा हात”, माकपाचा आरोप; नेमकं काय म्हणाले?
tiger attacked farmer who went to pluck cotton in his field at Virur station in Rajura taluka
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; गावकऱ्यांमध्ये दहशत
ajit pawar visit massajog
शरद पवारांपाठोपाठ आता अजित पवारही मस्साजोगला भेट देणार
Story img Loader