यवतमाळ : सध्या कडाक्याची थंडी असल्याने घरोघरी शेकोटी पेटवली जात आहे. मात्र, हीच शेकोटी एका महिलेच्या जीवावर बेतली. शेकोटीची ऊब घेत असताना आग लागल्यामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील मांगली येथे घडली. शकुंतला पुंडलिक भोयर (७५, रा. मांगली, ता. मारेगाव) असे जळालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुढचे पाच दिवस आणखी थंडीचे; काय सांगतो हवामान खात्याचा इशारा?

सध्या तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे वृद्धांसह सामान्य नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. शकुंतला भोयर यांनीदेखील शनिवारी सकाळी उठल्यानंतर शेकोटी पेटवली. शेकोटीची ऊब घेत असतानाच नकळतपणे वृद्ध महिलेच्या ब्लँकेटला आग लागली. आगीने चांगलाच भडका घेतला. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ आग विझवून शकुंतला भोयर यांना प्रथम मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आज, रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.