नागपूर: डी.जे.च्या आवाजाने कानांवर तर लेझर लाईट्समुळे डोळ्यांवर परिणाम होत असल्याने त्यावर बंदी घाला, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने केली आहे.या विरोधात पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली.
सणासुदीच्या काळात विविध उत्सव साजरे केले जातात. त्यात डी.जे व लेझर लाईट्सचा मुक्त वापर केला जातो. विशेषत: तरुण पिढी या कार्यक्रमाकडे आकर्षित व्हावी हा यामागे उद्देश असतो.परंतु याचे दुष्परिणाम आता दिसून येत आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या कानावर व डोळ्यावर परिणाम होत असल्याचे राज्यात काही भागांमध्ये आढळून आले आहे. तशा बातम्याही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या डी.जे. व लेझर लाईट्सवर शासनाने कायमस्वरुपी बंदी घालावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा सचिव अरुण लाटकर यांनी केली आहे. या विरोधात पक्षातर्फे व्हेरायटी चौकात निदर्शनेही करण्यात आली. त्यात प्रामुख्याने मनोहर मुळे, रामेश्वर चरपे, विठ्ठल जुनघरे,ॲड. विजय फुलकर,अंजली तिरपुडे, विजया जांभुळकर व अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.