नागपूर: मेटलाॅक ही कंपनी काटोलमध्ये १६ कोटी रुपयांची गुंतवणूक करून उद्योग उभारणार आहे. त्याबाबत संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमिताभ सिन्हा यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातील चिटणवीस सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी कंपनीच्या संचालिका आर. सिन्हा उपस्थित होत्या. अमिताभ सिन्हा म्हणाले, देशात इंडियन एसएमई फोरमकडून प्रत्येक वर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या १०० उद्योगांना पुरस्कृत केले जाते. यंदा राज्यातील १५ उद्योजकांची निवड झाली असून विदर्भातून सन्मान मिळवलेले आम्ही एक आहोत. आम्ही इंजिनसह विविध साहित्य चिटकवणारे इंजिनिअरिंगचे साहित्य बनवतो.

हेही वाचा… नागपुरातील प्रदुषणात ऑक्टोबर महिन्यात वाढ; ३१ दिवसांपैकी २१ दिवस प्रदूषण

आम्ही थर्मल उत्पादनातील उष्णता कमी करणारे विशिष्ट पॅडही तयार केले आहे. लवकरच सिलिकाॅनवर आधारित उत्पादन घेण्यासाठी काटोलमध्ये जागा मागवण्यात आली आहे. येथे सुमारे १६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उद्योग उभारणीचा प्रस्ताव आहे. ते झाल्यास येथे काही लोकांना रोजगार मिळू शकेल. सध्या कळमेश्वर, बंगळुरूसह इतरही काही भागात उद्योग उभारले असून विविध चिटकवणारे उत्पादन तयार केले जात असल्याचेही सिन्हा म्हणाले. आम्ही बंदुकीची गोळी चिटकवणारे रसायनही बनवू शकत असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.